अर्जुन कपूर आर. बल्की यांचा आगामी चित्रपट ‘की अँड का’ चित्रपटात करीना कपूर खानसोबत दिसणार आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेली महिला-पुरुष समानता हा चर्चेचा विषय बनला आहे. अर्जुनने जागतिक महिला दिनानिमित्त एक अत्यंत सुंदर संदेश देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने म्हटले आहे की, ‘मी माझी आई आणि बहीण यांच्याभोवतीच लहानाचा मोठा झालो. महिला स्वत:ची काळजी न घेता, घरातील पुरुषवर्गाचीच जास्त काळजी करतात. तुम्ही जर चांगले व्यक्ती असाल तर हा दिवस योग्यप्रकारे साजरा कराल.’
महिलाच पुरुषांसाठी प्रेरणा स्थान!
By admin | Updated: March 11, 2016 02:07 IST