कंगना राणौत सध्या बॉलिवूडमधून दिसेनासी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका अॅवार्ड इव्हेंटमध्ये कंगना अखेरची दिसली आणि त्यानंतर अटलांटाला रवाना झाली. गेल्या काही महिन्यांपासून कंगना येथेच मुक्काम ठोकून आहे. कशासाठी? तर हंसल मेहता यांच्या ‘सिमरन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी. सर्वप्रथम कंगनाने या चित्रपटासाठीच्या वर्कशॉपमध्ये भाग घेतला आणि यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरण सुरु केले. ‘सिमरन’मध्ये कंगनाची भूमिका नेमकी कशी असेल, याच्या अनेक चर्चा सध्या कानावर येत आहेत. यात ती ३० वर्षांच्या घटस्फोटित महिलेची भूमिका साकारणार असल्याचेही कळतेय. याच पार्श्वभूमीवर ‘सिमरन’च्या सेटवरचा एक फोटो आमच्या हाती लागला आहे. यात कंगना तिच्या खऱ्या वयापेक्षा बरीच वयस्कर दिसते आहे. या फोटोत कंगनाचे केस ग्रे कलरमध्ये रंगवलेले दिसताहेत. मेहतांसोबतचा कंगनाचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. अशा अवतारात कंगना ‘सिमरन’मध्ये दिसणार असेल तर तुम्हा-आम्हा सर्वांसाठीच तो मोठा आश्चर्याचा धक्का ठरणार आहे. पण असे नाही आहे. हा फोटो जरा निरखून बघितल्यावर यातली खरी गोम तुमच्या लक्षात येईल. होय, कंगना व हंसल मेहता यांनी अटलांटाच्या एका विग शॉपमध्ये हा फोटो घेतला आहे. कदाचित चित्रपटातील हटके लूकसाठी कंगना आणि हंसल वेगवेगळे विग ट्राय करण्यासाठी या दुकानात आले असावेत आणि याचदरम्यान ग्रे कलरचा एखादा विग कंगनाने ट्राय केला असावा. शेवटी सगळेच अंदाजच आहेत.
‘सिमरन’मध्ये अशी दिसेल कंगना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 03:01 IST