Join us

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीनंतर देशमुख कुटुंबातील 'ही' व्यक्ती बांधणार लग्नगाठ? फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:15 IST

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या लगीनघाई सुरू आहे. सध्या अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र नुकताच एक फोटो समोर आला आहे ज्यात आता थेट अरुंधतीनंतर ईशाचे लग्न होणार आहे असे दिसते आहे. ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचा एक फोटो समोर आला आहे. जो पाहून सगळेच अवाक झाले आहेत.

आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नासाठी सगळे तयार झालेत. अगदी कांचन देखील लग्नासाठी होकार देते. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नात कांचन देखील सहभागी होत असल्यामुळे सगळेच आनंदी आहेत. अशातच ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरेच्या फॅन पेजवरून धुलिवंदनाच्या शुभेच्छा देत तिचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने साडी नेसली आहे आणि तिचा चेहरा रंगाने माखलेला दिसतो आहे. तसेच तिच्या गळ्यात मंगळसूत्र देखील पाहायला मिळत आहे. अरुंधतीनंतर आता ईशाचे लग्न होणार का? असा प्रश्न हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना पडला आहे.

अभिनेत्री अपूर्वा गोरे हिला आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. ईशाच्या भूमिकेतून अपूर्वा गोरे हिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अपूर्वाचे इंजिनिअरींग झाले असून या आधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सोनी मराठी ती फुलराणी मालिकेत गुड्डीची भूमिका साकारली होती. 

 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका