Join us

रिचा सरबजीत सिंगच्या पत्नीची भूमिका करणार

By admin | Updated: October 24, 2015 11:22 IST

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुड्डा यांच्या निवडीनंतर आता रिचा चढ्ढादेखील सरबजीत सिंगच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे.

ऐ श्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुड्डा यांच्या निवडीनंतर आता रिचा चढ्ढादेखील सरबजीत सिंगच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. रिचा म्हणाली की, तिने उमंग कुमार यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या चित्रपटाला साइन केले आहे. त्यांनी माझ्याकडे या रोलसाठी संपर्क केला होता. मी ही भूमिका साकारणार आहे. खरं तर अद्याप पेपर वर्क आणि कायदेशीर बाबीच पूर्ण झाल्या असून मी याविषयी जास्त काही बोलणार नाही. यात मी सरबजीत सिंगच्या पत्नीचा रोल करणार आहे. रणदीप (सरबजीत) च्या पत्नीचा रोल आॅफर झाला आहे.