या वर्षी दिवाळी साजरी करू शकणार नसल्याचे प्रियंका चोप्राचे म्हणणे आहे. तिला कंजेक्टिवायटिस (डोळ्यांचे संक्रमण) झाल्याने यावर्षी दिवाळी साजरी करणे शक्य होणार नसल्याचे तिने सांगितले. सध्या संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे शूटिंग करत असलेल्या प्रियंकाला शूटिंगही थांबवावे लागले आहे. प्रियंकाने टिष्ट्वट केले आहे,‘काय वाईट परिस्थिती आहे. शूट रद्द, दिवाळी रद्द. त्याऐवजी मी कन्जेक्टिवायटिससोबत बिछान्यावर बसली आहे. मी कोणाला मारू शकते का?’ प्रियंकाने तिच्या सूज आलेल्या डोळ्याचा फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की,‘याकडे पाहू नका.’ प्रियंका बाजीराव मस्तानी या चित्रपटात पेशवा बाजीरावची पत्नी काशीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिवाळी साजरी करू शकणार नाही : प्रियंका
By admin | Updated: October 23, 2014 01:02 IST