Join us  

राजकारणात स्वतःचं नशीब आजमावणार अभिषेक बच्चन? या भागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:17 AM

बॉलिवूड सिनेमांमध्ये छाप पाडणारा अभिषेक बच्चन आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत. सविस्तर बातमी वाचा

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. अनेक कलाकारही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात एन्ट्रीसाठी रणदीप हूडा, उर्वशी रौतेला, कंगना रणौत या कलाकारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अशातच एक मोठं नाव समोर येतंय ते म्हणजे अभिषेक बच्चन.अभिषेक बच्चन सुद्धा निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिषेकला समाजवादी  पार्टीकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे. मध्य प्रदेश खजुराहो मतदार संघातून अभिषेकला निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अभिषेकला निवडणुकीचं तिकीट मिळाल्यास समाजवादी पार्टी पक्षाकडून इतर पक्षांना कडवं आव्हान असेल यात शंका नाही. अजुनतरी स्वतः अभिषेकने याविषयी कोणताही अधिकृत खुलासा केला नाही.

अभिषेकच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर, तो काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या 'घूमर' सिनेमात दिसला. या सिनेमाला लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय लवकरच अभिषेक शुजित सरकारच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर रिलीज होईल. अभिषेकने राजकारणात प्रवेश केल्यास त्याला लोकांकडून कशी मतं मिळतील, हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनबॉलिवूड