Join us  

या प्रसिद्ध व्यक्तीने दिला होता माधुरी दिक्षितसह लग्न करण्यासाठी नकार, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 11:46 AM

अमेरिकेत राहणारे डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करत तिथेच स्थायिक झाली होती. अखेर अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपल्या कुटुंबासह माधुरी परत मायदेशी परतली आणि पुन्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली.

आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने. माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र आजही माधुरीला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जातात. 

अमेरिकेत राहणारे डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करत तिथेच स्थायिक झाली होती. अखेर अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपल्या कुटुंबासह माधुरी परत मायदेशी परतली आणि पुन्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली. आजही माधुरीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. 

फिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यातल्या काही गोष्टींमुळेही माधुरी चर्चेत असते. माधुरीच्या लग्नाआधीचा एक किस्सा आजही तितकाच चर्चेत असतो. माधुरीच्या लग्नासाठी स्थळ शोधत असताना कुटंबाने गायक सुरेश वाडकर यांच्यासाठी माधुरीचे स्थळ सुचवले होते. मात्र सुरेश वाडकर यांनी माधुरीसह लग्न करण्यास नकार दिला होता.

मुलगी खुप सडपातळ आहे असे कारण त्यांनी त्यावेळी दिले होते. सुरेश वाडकर यांचा नकार आल्यानंतर माधुरीच्या कुटुंबियांच्याही चिंता अधिक वाढल्या होत्या.माधुरी जर असेच बॉलिवूडमध्ये काम करत राहिली तर तिला लग्नासाठी योग्य स्थळ मिळणार नसल्याचे कुटंबाला वाटू लागले होते. 

माधुरीच्या नशिबात सुरेश वाडकर नाही तर डॉ. श्रीराम नेने होते. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा माधुरी श्रीराम यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा ती बॉलिवूडची  सुपरस्टार होती. ही गोष्ट श्रीराम नेनेंना अजिबात माहिती नव्हती. माधुरीचा भारतात किती मोठा चाहता वर्ग आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती.

दोघांनाही पहिल्याच भेटीत एकमेकांची साथ आवडल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रेशीमगाठीत अडकले. आज माधुरी आणि श्रीराम नेने यांचा सुखाने संसार सुरु आहे. या कपलला दोन मुलं आहेत. आपल्या कुटुंबासह माधुरी खास क्षणाचे सेलिब्रेशन करताना दिसते.

टॅग्स :माधुरी दिक्षितसुरेश वाडकर