Join us  

'घर बंदूक बिरयानी'साठी आकाशच का?, नागाराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 4:50 PM

‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमासाठी नागराज अण्णांनी आकाश ठोसर आणि सायलीच कास्टिंग का केलं याचा खुलासा त्यांनी केलाय.

नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. नागराज अण्णांची या सिनेमात तडफदार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आकाश ठोसर, सयाजी शिंदे अन् सायली पाटीलही यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली सर्वांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते लोकमतच्या पंचायत या कार्यक्रमात देखील आले होते. 

यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल प्रश्न विचारल्यावर नागराज मंजुळे म्हणाले, घर बंदूक बिरियानीच्या कथेच्या गरजेनुसार कास्टिंग केलं. सयादादाला पल्लमच्या भूमिकेत फिट दिसले म्हणून मी त्याला विचारलं. सायलीला पण आता जो सिनेमातला रोल आहे त्याला बद्दल मी विचारला तिला ही ती भूमिका आवडली. तिने ही हो म्हटलं. आकाश आणि मला आम्हाला दोघांना काहीतरी करायचे होते. या सिनेमाची सुरुवात आकाशासाठी करायची म्हणून झाली होती.  या सिनेमात नवीन बरेच चेहरे आहेत, जे पहिल्यांदा माझ्यासोबत काम करतायेत. 

'घर बंदुक बिरयानी' हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. सिनेमात स्वत: नागराज मंजुळे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील तसंच अभिनेते सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडले असून आता चित्रपटाची उत्सुकता आहे.

टॅग्स :नागराज मंजुळेआकाश ठोसरसयाजी शिंदे