Join us

लग्नाच्या ६ वर्षांपूर्वी फराह खानच्या पार्टीत चक्क सिंदूर लावून गेली होती ऐश्वर्या राय बच्चन, इंटरेस्टिंग आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:59 IST

2001 मध्ये ऐश्वर्या रायचे लग्न झाले नव्हते. मात्र या पार्टीत ती सिंदूर लावून गेली होती. फराह खानने या मागचं कारणही सांगितलं आहे.

चित्रपट निर्माती फराह खान (Farah Khanने एक थ्रोबॅक सुंदर फोटो शेअर केले आहे. या फोटोत त्याच्यासोबत इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार्स दिसत आहेत. करण जोहर (Karan Johar), साजिद खान (Sajid Khan), राणी मुखर्जी(Rani Mukerji, फरहान अख्तर(Farhan Akhtar)  आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan)  दिसत आहेत. मात्र या फोटोतील प्रेक्षकांच्या नजरा  फक्त ऐश्वर्या राय बच्चनवरच खिळल्या आहे. याचे कारण म्हणजे ऐश्वर्याने लावले सिंदूर.

का खास आहे फोटोया फोटोसोबत फराह खानने या फोटो मागचे गुपीत ही सांगितले आहे. फराह म्हणाली हा फोटो 2001 सालचा आहे. जेव्हा त्याने पहिले घर विकत घेतले. तसेच करण जोहरसाठी त्याने लिहिले की, हा एक अत्यंत दुर्मिळ फोटो आहे जेव्हा करण जोहर पहिल्यांदाच नॉन-डिझायनर कपड्यांमध्ये दिसला होता. तसेच  ऐश्वर्या रायने भांगेत सिंदूर का लावले होते याचाही तिने खुलासा केला आहे.

फराह खानने सांगितलं यामागचे कारण2001 मध्ये ऐश्वर्या रायचे लग्न झाले नव्हते. मात्र या फोटोमध्ये ती सिंदूर लावून आलेली दिसतेय. त्यामुळे 12 वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय फराह खानच्या पार्टीत सिंदूर लावून का गेली होती, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. याचे उत्तर खुद्द फराह खानने तिच्या पोस्टमध्ये दिले आहे.

फराह खानने या  फोटोबद्दल सांगितले की, खरंतर ऐश्वर्या राय बच्चन त्यावेळी संजय लीला भन्साळी आणि शाहरुख खानसोबत देवदास चित्रपट काम करत होती. सेटवरून ती थेट फराह खानच्या घरी पोहोचली होती आणि त्यामुळेच तिच्या कपाळावर सिंदूर लावलेले होते.

कधी झाले ऐश्वर्याचं लग्न ऐश्वर्या राय बच्चनने 2007 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव आराध्या आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनफराह खान