Join us

कोण होणार ‘सुलतान’ची हिरोईन?

By admin | Updated: July 25, 2015 03:42 IST

बजरंगी भाईजानने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: धूम केली आहे. बजरंगीनंतर सलमान खानचा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर येणारा चित्रपट ‘सुलतान’

बजरंगी भाईजानने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: धूम केली आहे. बजरंगीनंतर सलमान खानचा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर येणारा चित्रपट ‘सुलतान’ सध्या चर्चेत आहे. यशराज बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. परंतु आतापर्यंत या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची माहिती नाही, तसेच चित्रपटाच्या टीमविषयी काही माहिती नाही. सलमानची हिरोईन कोण असेल याविषयी चर्चा होत आहे. दीपिका पदुकोनपासून कंगणा आणि परिणिती चोप्रापर्यंत सर्वांची नावे ऐकण्यात येत आहेत. मात्र, हिरोईन निवडण्याची स्पर्धा सुरू असल्याच्या केवळ अफवाच आहेत. एका मुलाखतीदरम्यान सलमानला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, चित्रपटात दोन हिरोईन असून एक स्टार हिरोईन आणि एक न्यूकमर हिरोईन असेल.