Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, कोण आहे राखी सावंतचा होणारा पती दीपक कलाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 11:30 IST

राखीच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना जितका धक्का बसला नाही, तितका धक्का राखीच्या होणाऱ्या नव-याचे नाव ऐकून बसला आहे. होय, दीपक कलालसोबत राखी लग्न करणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देत्या ३१ डिसेंबरला राखी दीपक कलालसोबत लग्न करतेय. कालच लग्नाची पत्रिका जारी करत राखीने लग्नाची डेट जाहिर केली.

दीपिका पादुकोण - रणवीर सिंग लग्नबेडीत अडकले. त्यांच्यापाठोपाठ प्रियांका चोप्रा- निक जोनास, कपिल शर्मा- गिन्नी चतरथ लग्नबंधनात अडकणार आहे. यानंतर बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ही सुद्धा लग्नासाठी सज्ज झाली आहे. येत्या ३१ डिसेंबरला राखी दीपक कलालसोबत लग्न करतेय. कालच लग्नाची पत्रिका जारी करत राखीने लग्नाची डेट जाहिर केली.राखीच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना जितका धक्का बसला नाही, तितका धक्का राखीच्या होणाऱ्या नव-याचे नाव ऐकून बसला आहे. होय, दीपक कलालसोबत राखी लग्न करणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता हा दीपक कलाल कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल.तर राखीचा होणारा पती दीपक कलाल हा इंटरनेट सेन्सेशन आहे. सोशल मीडियावरचे स्वत:चे फोटो आणि व्हिडिओमुळे तो सतत चर्चेत असतो.

सध्या दीपक कलाल  ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्ये दिसतो आहे. तो आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो.

दीपकचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. त्याचे फोटो आणि चित्रविचित्र व्हिडिओ कायम चर्चेत असतात.

इंटरनेट सेन्सेशन बनण्यापूर्वी दीपक कलाल हा पुण्यातील एका हॉटेलात रिसेप्शनिस्ट होता.

बिकट आर्थिक स्थितीमुळे दीपक कलालला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. तो केवळ दहावीपर्यंत शिकला आहे. यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा छोटासा कोर्स केला आणि रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारली.

सोशल मीडियावरच्या त्याच्या प्रोफाईलनुसार, दीपक कलाल एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. गोव्यात त्याचे एक हॉटेलही आहे.

२०११ मध्ये काश्मिरातून त्याचा पहिला व्हिडिओ आला. यानंतर त्याचे अनेक अ‍ॅडल्ट व्हिडिओही आलेत. या व्हिडिओसाठी तो प्रचंड ट्रोलही झाला. दीपक कलालला ‘बिग बॉस 12’ची आॅफर आली होती. पण दीपकने ही आॅफर धुडकावून लावली.

टॅग्स :राखी सावंत