Join us

भाऊ-बहिणीत कोण सरस?

By admin | Updated: May 24, 2017 00:42 IST

आपल्या करिअरमध्ये प्रत्येक जण यशस्वी होतोच असे नाही. काहींना आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळते तर काही जणांना शेवटपर्यंत यश मिळवण्यासाठी स्ट्रगल करावे लागते.

- गीताजंली अंबरेआपल्या करिअरमध्ये प्रत्येक जण यशस्वी होतोच असे नाही. काहींना आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळते तर काही जणांना शेवटपर्यंत यश मिळवण्यासाठी स्ट्रगल करावे लागते. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक भाऊ-बहिणींच्या जोड्यात आहेत. ज्यापैकी एक जण आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाला आहे तर दुसरा यश मिळवण्यासाठी आज संघर्ष करताना दिसतोय. यापैकी अनेक जणांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. एक नजर टाकूया अशाच काही भाऊ-बहिणींच्या जोड्यांवर...सलमान खान आणि अरबाज खान सलमान खान आणि अरबाज खानच्या जोडीने ‘हॅलो ब्रदर’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘दबंग’ सारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. सलमान खान हे आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील महत्त्वाचे नाव आहे. सलमानचा करिअर ग्राफ ‘मैंने प्यार किया’ पासून अलीकडे आलेल्या ‘एक था टायगर’ पर्यंत नेहमीच चढता राहिला. अरबाजला मात्र अभिनय क्षेत्रात आपली वेगळी जागा निर्माण करता आली नाही. त्यानंतर अरबाजने आपल्या मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवला. तिथे त्याला समाधानकारक यश मिळते आहे.सनी देओल आणि बॉबी देओलसनी आणि बॉबी देओल या जोडीने ‘अपने’, ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटांत एकत्र झळकले होते. सनी देओलचे बॉलिवूड करिअर यशस्वी झाले तर बॉबीला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे यश मिळवता आले नाही. सनीने आपल्या करिअरमध्ये ‘घायल’, ‘बॉर्डर’, ‘दामिनी’, ‘गदर एक प्रेमकथा’ असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. बॉबीने ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले खरे आणि हा चित्रपट देखील हिट झाला. मात्र, बॉबीचे करिअर फ्लॉपच राहिले. त्याचा ‘सोल्जर’, ‘बादल’, ‘बिच्छू’ आणि ‘अजनबी’ असेच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी शिल्पा शेट्टी और शमिता शेट्टी यांनी अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. २००२मध्ये आलेल्या ‘फरेब’ चित्रपटात त्या एकत्र दिसल्या होत्या. शिल्पाने १९९३ साली आलेल्या बाजीगर चित्रपटातून एंट्री केली तर शमिताने ‘मोहब्बतें’ मधून डेब्यू केले. चित्रपटसृष्टी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात शिल्पाला यश आले. मात्र, शमिता याबाबतीत अयशस्वी ठरली. शिल्पा आजही बॉलिवूडच्या टॉप टेन अभिनेत्रींमध्ये मोजली जाते तर शमिता आजही सक्सेस मिळवण्यासाठी स्ट्रगल करताना दिसतेय. आमिर खान आणि फैजल खान आमिर खान आणि फैजल खानने ‘मेला’ या २००० मध्ये आलेल्या चित्रपटात एकत्र काम केले होते. आमिरला आज बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखतात तर फैजलला आजही फारसे लोक ओळखत नाहीत. फैजल काही मोजक्याच चित्रपटांत झळकला आणि ते चित्रपटही फ्लॉप ठरले. बॉलिवूडमधले अनेक हिट चित्रपट आमिरच्या नावावर आहेत. गेल्या काही वर्षांपासून हिट चित्रपट आणि आमिर खान असे जणू काही समीकरणच झाले आहे.