कोणत्याही कलाकाराला काम मिळवणं, त्या मिळालेल्या संधीचे सोनं करणं आणि यश प्राप्त करणं ही काही सोपी बाब नाही. जे कलाकार हे करू शकतात ते अगदी सुपरस्टारपद मिळवतात. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांच्यावर अभिनय कारकिर्द सोडण्याची वेळ येते. अभिनयाचे क्षेत्र सोडाव्या लागलेल्या कलाकारांपैकी एक सुपरस्टार म्हणजे प्रशांत थियागराजन .
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत 23 वर्षांपूर्वी जीन्स सिनेमात तो झळकला होता. त्यावेळी दक्षिणात्य सिनेसृष्टीचा तो सुपरस्टार म्हणून ओळखला जायचा. मात्र बॉलिूडमध्ये त्याला पाहिजे तसे यश मिळालं नाही.
त्यामुळे तो कधी आला आणि कधी गेला हेच समजले नाही. सिनेमात त्याची आणि ऐश्वर्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.
2000 नंतर त्याला फारशा ऑफर्स मिळाल्या नाहीत. अखेर 2006 मध्ये प्रशांतने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. करियरची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी 2011 मध्ये त्याने पुन्हा कमबॅक केले होते. त्याचा कमबॅकही फारसा यशस्वी ठरला नाही.अभिनयाव्यतिरिक्त त्याचा व्यवसायही आहे. प्रशांत एका ज्वेलरी मार्टचा मालक आहे.