Join us

"जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडता...", अभिज्ञा भावेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:42 IST

Abhidnya Bhave And Maihul Pai : अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केलीय.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे (abhidnya bhave) सतत चर्चेत येत असते. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिज्ञा सध्या हिंदी मालिका विश्वात तिचे स्थान निर्माण करताना दिसते आहे. अभिज्ञा मेहुल पै याच्यासोबत लग्नबंधनात अडकली असून मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिज्ञा भावेने इंस्टाग्रामवर पती मेहुल पैसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, नुकतेच ऐकले होते "जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही दररोज त्याच्या प्रेमात पडाल!" याचा अर्थ काय आहे हे मला जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद!!!! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे सर्वस्व पै. देव तुला उत्तम आरोग्य देवो. कारण बाकी गोष्टींसोबत मैं हूं ना. 

अभिज्ञा भावेने या वर्षी जानेवारी महिन्यात मेहुल पै याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा आहे आणि गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तिथे तो इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी सांभाळतो आहे. 

वर्कफ्रंटअभिज्ञा भावे सध्या स्टार प्लस वाहिनीवरील बातें कुछ अनकहीं सी मालिकेत काम करताना दिसते आहे. याआधी तिने कलर्स वाहिनीवरील बावरा दिल, २०१०मध्ये ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेत केले होते. तिने अनेक मराठी मालिकांमध्येही काम केले आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावे