Join us

४१ वर्षीय 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी कधी बांधणार लग्नगाठ?, प्रभाससोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची होती चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 19:40 IST

Anushka Shetty : अनुष्का शेट्टी ही तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला प्रभाससोबतच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'मुळे देशभरात ओळख मिळाली आहे.

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) ही तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सोलो हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, प्रभाससोबतच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'मुळे तिला देशभरात ओळख मिळाली. तिच्या दमदार अभिनयाचे कौतुक झाले. तसेच तिची प्रभाससोबतची जोडी आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. तसेच ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. इतकेच नाही तर चाहते त्यांच्या लग्नाबाबत जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत. दरम्यान आता अनुष्का शेट्टीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

लग्नाबाबत अनुष्का शेट्टी म्हणाली की, योग्य वेळ आल्यावर लग्न करणार आहे. ते अगदी नैसर्गिक असावे असेही तिचे मत आहे. त्याचवेळी प्रभाससोबत पुन्हा काम करण्याबाबत ती म्हणाली की, जर सशक्त कथा आणि क्रिएटिव्ह व्हिजन अशी ऑफर आली तर नक्कीच चित्रपट करेन. 

४१ वर्षीय अनुष्का शेट्टीचा चित्रपट 'मिस शेट्टी, मि. पोलीशेट्टी' प्रदर्शित झाला आहे. हा शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या 'जवान' चित्रपटासोबत रिलीज झाला. अनुष्काने एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये देवसेनाची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती प्रभासची पत्नी आणि आई या दोन्ही भूमिकांमध्ये दिसली होती.

आगामी प्रोजेक्टअनुष्का आता मल्याळम चित्रपट कथानार - द वाइल्ड सॉर्सरमध्ये दिसणार आहे. हा एक पीरियड फँटसी थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन रोजिन थॉमस करत आहेत. 

टॅग्स :अनुष्का शेट्टीबाहुबली