Join us  

'जाऊन तुझ्या बापाला विचार मी कोण आहे'; भरपार्टीत राज कुमारने केला होता सलमानचा पाणउतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 9:00 AM

Salman khan: सलमानचा हा बालिश प्रश्न ऐकल्यावर राज कुमार प्रचंड संतापले होते त्यामुळे त्यांनी पार्टीमध्येच त्याचा अपमान केला.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या दर्जेदार चित्रपटांसह दबंग स्टाइलमुळेही कायम चर्चेत असतो. सलमानचा कलाविश्वात चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे त्याच्याशी बोलताना अनेक जण १० वेळा विचार करतात. मात्र, प्रसिद्ध अभिनेता राज कुमार (Raaj Kumar) यांनी चारचौघांमध्ये सलमानची कानउघडणी केली होती. इतकंच नाही तर त्या घटनेनंतर सलमान चांगलाच ओशाळला होता.

१९८८ साली 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटात सलमान खाननेबॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने सहकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर १९८९ मध्ये आलेल्या सूरज बडजात्या यांच्या मैंने प्या किया या चित्रपटातून सलमानला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे सूरज बडजात्याने एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यात राज कुमार यांचाही समावेश होता. मात्र, राज कुमार व सलमान यांची पहिलीच भेट वादग्रस्त ठरली. 

सलमानच्या एका चुकीमुळे राज कुमारने केला अपमान

या पार्टीमध्ये सूरज बडजात्या, सलमानची प्रत्येक मोठ्या कलाकारासोबत ओळख करुन देत होते. यात चित्रपटातील सगळ्या कलाकारांना भेटण्याची इच्छा असल्याचं राज कुमार म्हणाले. त्यामुळे सूरज यांनी राज कुमार व सलमान यांची भेट घडवून आणली. परंतु, सलमानने विचारलेल्या प्रश्नामुळे राज कुमार नाराज झाले.

सलमानने विचारला 'हा' प्रश्न

राज कुमार यांची भेट घेतल्यानंतर 'तुम्ही कोण?' असा प्रश्न सलमानने विचारला. विशेष म्हणजे राज कुमार त्या काळातील प्रचंड लोकप्रिय अभिनेता असूनही सलमानने त्यांना ओळखलं नाही.

राज कुमार यांनी दिलं 'हे' उत्तर

सलमानचा हा बालिश प्रश्न ऐकल्यावर राज कुमार प्रचंड संतापले "आणि, एक काम कर घरी जा आणि तुझ्या अब्बाला विचार मी कोण आहे", असं उत्तरं राज कुमार यांनी दिलं. दरम्यान, राज कुमार आणि सलमान यांचा पार्टीतील हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.

टॅग्स :सलमान खानराज कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा