Join us

'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील कलाकार जेव्हा इशा केसकरचं करतात रॅगिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 11:39 IST

अभिजीत खांडकेकर, यश प्रधान आणि अभिनेत्री श्वेता मेहंदळे यांनी तिला ‘गावात नवीन पाखरू आलंय; या डायलॉगवर म्यूजिकली व्हिडीओ करायला लावला.

ठळक मुद्देगुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना भावते आहेप्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकंच पसंत करत आहेतइशा सगळ्यांची मैत्रीण असली तरी तिचे सहकलाकार तिचं रॅगिंग करतात

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.  नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आहे. रसिका सुनीलच्या जागी आता अभिनेत्री ईशा केसकर ही शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकंच पसंत करत आहेत.

मालिकेच्या सेटवर जरी इशा सगळ्यांची मैत्रीण असली तरी तिचे सहकलाकार तिचं रॅगिंग करतात असं तिचं म्हणणं आहे. इशा हिने अभिनेत्री रसिका सुनील हिची जागा घेतली असून ईशाची मालिकेत एंट्री झाल्यावर गॅरी, रेवती आणि गुप्ते म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर, यश प्रधान आणि अभिनेत्री श्वेता मेहंदळे यांनी तिला ‘गावात नवीन पाखरू आलंय; या डायलॉगवर म्यूजिकली व्हिडीओ करायला लावला. तसेच इशा अथर्व नंतर सेट वरती सगळ्यात लहान आहे आणि तिचे खाण्यापिण्याचे पण नखरे आहेत त्यामुळे हे तिघंही तिला प्रत्येकवेळी खाण्याबद्दल तसदी देतात.

ईशाच्या या रॅगिंग बद्दल शेअर करताना म्हणाली, "मालिकेत मी नवीन आहे आणि सेटवर अथर्व नंतर सगळ्यात लहान आहे म्हणून श्वेता, यश आणि अभिजित माझं रॅगिंग करणार असं त्यांनी मला आधीच सांगितलेलं. पण माझे हे सहकलाकार खूप गोड आहेत त्यामुळे त्यांचं रॅगिंग पण तितकंच मजेशीर आहे."

याआधी शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. शनाया ही व्यक्तिरेखा या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनीलने या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र या मालिकेतून नुकतीच तिने एक्झिट घेतली. या मालिकेत आता शनायाची भूमिका इशा केसकर साकारत आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकीच पसंती देत आहेत.

टॅग्स :ईशा केसकरमाझ्या नवऱ्याची बायको