Join us

जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्या रायबद्दल अभिनेत्याने जाहीरपणे केला होता धक्कादायक खुलासा, आजही ठरतो चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:04 IST

इम्रानला आज सिरियल किसर म्हणूनच जास्त ओळखतात. अशी इमेज बनवायची खरोखर त्याची इच्छा नव्हती. हे त्याने एका मुलाखतीत सांगितलेही होते.

 'कॉफी विथ करण' करण जोहरच्या शोमध्ये सेलिब्रेटी मंडळी हजेरी लावत. या शोच्या माध्यमातून सेलिब्रेटींचे अनेक किस्से जगासमोर आले होते. आजही सेलिब्रेटीच्या अशा काही गोष्टी आहेत. ज्या आजही चर्चेचा विषय ठरतात.  इमरान हाश्मी आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या झालेला वाद आजही रसिक विसरलेले नाहीत. ऐश्वर्याबद्दल इमरान हाश्मीने नॅशनल टीव्हीवर बोलणे कोणालाच फारसे आवडले नव्हते.

त्याने ऐश्वर्याला थेट प्लॅस्टीक म्हणून संबोधले होते. याला कारणही तसेच आहे. इमरान असलेल्या सिनेमात ऐश्वर्याला काम करायचे नव्हते. ही गोष्ट इमरानलाही चांगलीच माहिती होते. त्यामुळे राग काढण्यासाठी मिळालेली संधीचे सोने करत त्याने ऐश्वर्याला सुनावले होते.  जेव्हा ऐश्वर्याला बादशाहो चित्रपटाची ऑफर दिली गेली होती तेव्हा तिने इमरान हाश्मीमुळे काम करण्यास नकार दिला होता. 

नंतर इम्रानने त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि असे सांगितले की, हँपरला जिंकायच्या नादात जे नव्हते बोलायचे ते ही तो बोलून गेला असे सांगत वेळ मारुन नेली होती.पण हा वाद इथेच संपला नाही. एका फॅशन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा ऐश्वर्याबरोबर रॅपिड फायर राऊंड खेळला गेला तेव्हा ती म्हणाली की तिच्या आयुष्यातील सर्वात हास्यास्पद कमेंट कोणी केली असेल तर ती होती इमरान हाश्मीची.

इम्रानला आज सिरियल किसर म्हणूनच जास्त ओळखतात. अशी  इमेज  बनवायची खरोखर त्याची इच्छा नव्हती. हे त्याने एका मुलाखतीत सांगितलेही होते. सिनेमाच्या अशाच ऑफर येत गेल्या आणि कामही करायचे होते. मग असे काम स्विकारत गेल्याचे त्याने सांगितले होते. स्वत: इम्रानही सीरियल किसरच्या टॅगमुळे खुश नसल्याचे त्याने सांगितले होते.

इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत

इमरान हाश्मीने विविध भूमिका साकारून अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. पण, तुम्हाला माहिती आहे का की इमरान हाश्मीची बहीणही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्याची बहिण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इमरान हाश्मीच्या बहिणीचे नाव आलिया भट आहे.वास्तविक, इमरान हाश्मीच्या आजीच्या बहिणीचे नाव शिरीन मोहम्मद अली होते. शिरीन मोहम्मद अली महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची आई होती. इमरान आणि आलिया या नात्यातून भावंडे आहेत. उल्लेखनीय आहे की एकदा चित्रपट निर्माते आलिया भट सोबत काम करण्याच्या प्रस्तावाला इमरान हाश्मीकडे गेले होते. इमरानने चित्रपट निर्मात्यांना नकार दिला.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनइमरान हाश्मी