बॉलीवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटात आपल्याला एखाद्या तरी भूमिकेत झळकायला मिळावे, अशी इच्छा अनेक कलाकारांची असते. सोनाली कुळकर्णीने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. सध्या मराठी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने ती हिंदी चित्रपटात काम करत नाहीये. सोनाली नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान करण जोहरला भेटली. त्या भेटी दरम्यान त्यांनी काढलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोला सोशल मीडियावर खूप लाइक्स मिळत आहेत. बरेच दिवस सोनाली आपल्याला बॉलीवूडमध्ये दिसली नाही. नुकतीच तिची आणि करणची झालेली ही भेट पाहता ती बॉलीवूडमध्ये लवकरच दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सोनाली-करणच्या भेटीचे गुपित काय?
By admin | Updated: September 8, 2016 03:28 IST