Join us  

सीबीआयचा फुल फॉर्म काय? प्रश्नावर रिया चक्रवर्तीची प्रतिक्रिया चर्चेत; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 10:24 AM

रिया आणि सीबीआयचं नातं फारच जवळचं आहे.

2020 साली बॉलिवूड अभिनेता सुशांतसिग राजपूतने (Sushantsingh Rajput) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) अनेक आरोप झाले आणि तिला अटकही झाली. रिया महिनाभर तुरुंगात होती आणि नंतर तिची जामिनावर सुटका झाली. सुशांतच्या आत्महत्येला तिलाच जबाबदार धरण्यात आलं. दरम्यान सुशांतची केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. त्यामुळे रिया सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. सध्या रिया एमटीव्हीच्या रोडीजमध्ये गँग लीडर असून शोमध्ये सीबीआयचा फुल फॉर्म विचारण्यात आल्यानंतर रियाने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे'.

'एमटीव्ही रोडीज 19' मध्ये रिया आणि गौतम गुलाटी गँग लीडर आहेत. एका स्पर्धकाला सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारत असतानाच गौतम गुलाटीने सीबीआयचा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न विचारला. यावर त्या स्पर्धकाऐवजी रियानेच हात वर करत मला माहित आहे अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान स्पर्धकाने 'क्राईम ब्रांच इन्व्हेस्टिगेशन' असे चुकीचे उत्तर दिल्यानंतर रिया स्वत:च उत्तर देत म्हणाली, 'सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'. रियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रिया आणि सीबीआयचं नातं फारच जवळचं आहे. सुशांतला ड्रग्स पुरवल्याचा, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा तिचा डाव होता असे अनेक आरोप तिच्यावर लावले गेले. कोरोनाचा काळ असल्याने तेव्हा सर्वच घरात होते कामही करता येत नव्हतं. अशा परिस्थितीत सुशांत आणि रिया दोघेही त्याच्या फ्लॅटवर राहत होते. त्याचवेळी सुशांतने टोकाचं पाऊल उचललं आणि तो हे जग सोडून गेला. यानंतर रिया मात्र अडचणीत सापडली.

टॅग्स :रिया चक्रवर्तीटेलिव्हिजनगुन्हा अन्वेषण विभाग