Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, सिद्धार्थ-तेजस्वीला मागे टाकलं; कसं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:09 IST

बिग बॉसच्या १६ व्या सीझनच्या विजेत्याचं नाव जाहीर होताच सर्वांना धक्का बसला होता.

नवी दिल्ली-

बिग बॉसच्या १६ व्या सीझनच्या विजेत्याचं नाव जाहीर होताच सर्वांना धक्का बसला होता. चाहत्यांना वाटलं होतं की प्रियांका चाहर चौधरी किंवा शिव ठाकरे या दोघांपैकी एक जण कुणीतरी जिंकेल. पण सलमान खान यानं जसं एमसी स्टॅन याचं नाव जाहीर केलं तसं सर्वच अवाक् झाले. अनेकांनी सोशल मीडियात एमसी स्टॅनच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच त्याच्या लोकप्रियतेबाबतही सवाल केले गेले. पण एमसी स्टॅन खरंच सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय आहे याचं एक उत्तम उदाहरणच आता समोर आलं आहे. एमसी स्टॅनची फॅन फॉलोइंग विराट कोहली, सिद्धार्थ शुक्ला आणि तेजस्वी प्रकाशपेक्षा जास्त आहे. 

आता विराट कोली भारतातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रिटी आहे असं तुम्ही म्हणाल. मग एमसी स्टॅन कोहलीपेक्षा अधिक लोकप्रिय कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची एक पोस्ट यामागचं कारण ठरली आहे. 

एमसी स्टॅनचे इन्स्टाग्रामवर ७० लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये त्याची सोशल मीडिया टीम देखील सक्रीय नव्हती. बिग बॉसमधील त्याच्या कामगिरीबाबत त्याच्या टीमकडून कोणतीही पोस्ट केली गेली नव्हती. पण जसं विजेता म्हणून एमसी स्टॅनचं नाव जाहीर झालं आणि बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत त्याचा फोटो पोस्ट केला गेला. तसं या पोस्टवर नुसता लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. 

अवघ्या काही तासांत एमसी स्टॅनच्या या पोस्टनं आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीस काढले. त्याच काळात विराट कोहलीनं पोस्ट केलेल्या पोस्टला २० लाखाच्या जवळपास लाइक्स होते तर एमसी स्टॅनच्या पोस्टचे लाइक्स ६० लाखाहून अधिक होते. रॅपर एमसी स्टॅनची तगडी फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉसच्या घरातून जेव्हा स्टॅननं घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्याच्या सर्व चाहत्यांना सपोर्ट करत स्टॅनला पाठिंबा देत त्याचं मनोबल वाढवलं होतं. त्याचवेळी सलमाननंही एमसी स्टॅनला लोक भरभरुत वोट करत असल्याचं बोलून दाखवलं होतं. 

बिग बॉसचा आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय सदस्यबिग बॉसचे आतापर्यंतचे विजेत्यांची यादी पाहिली तर याआधी बिग बॉस सीझन १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्या विनिंग फोटोला एक मिलियनहून अधिक लाइक्स होते. त्यानं आपल्या आईसोबतचा फोटो पोस्ट केला होता. सिद्धार्थ देखील बिग बॉसच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक राहिला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तेजस्वी प्रकाश हिचा नंबर लागतो. तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या १५ व्या सीझनची विजेती आहे. याआधीचं सीझन जिंकल्यानंतर तेजस्वीनं आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टला १.३ मिलियन लाइक्स मिळाले होते.

टॅग्स :बिग बॉसविराट कोहली