Yuzvendra Chahal-Rj Mahvash: भारतीच क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा घटस्फोट झाला असून कोरिओग्राफर धनश्री वर्मापासून तो वेगळा झाला आहे. घटस्फोटाच्या काही दिवस आधीपासूनच युजवेंद्र हा आरजे महावशसोबत (RJ Mahavash) दिसत होता. दोघांनी स्टेडियममध्ये एकत्र बसून चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा आनंद घेतला. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसलेत. युजवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी ती आयपीएल सामान्यातही पोहचली होती. अशातच आता युजवेंद्रनं आरजे महावशसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अलिकडेच आरजे महावश हिची 'प्यार पैसा और प्रॉफिट' (Pyaar Paisa Profit ) ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही सिरीज पाहिल्यानंतर चहलनं तिच्यासाठी खास पोस्ट केली. त्यानं लिहलं, "'प्यार पैसा और प्रॉफिट पाहिल्यानंतर मी आरजे महावशचा फॅन झालो आहे". युझवेंद्रची स्टोरी रिशेअर करत आरजे महावशनं प्रतिक्रिया दिली. तिनं लिहलं, "धन्यवाद... तुम्ही ट्रॉफी आणा, आम्ही सिरीजचा पुढचा सीझन घेऊन येऊ".
दरम्यान, आर जे महावश ही अलिकडेच आजारी पडली होती. तिला डेंग्यूची (Rj Mahvash Infection Dengue) लागण झाली होती. आर जे महावश ही खूप लोकप्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आयुष्यातील अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल २.७ मिलीयन्स फॉलोवर्स आहेत. तिनं 'प्यार पैसा और प्रॉफिट' वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ही वेब सिरीज ७ मे २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. पहिल्याच सिरीजमध्ये तिनं बोल्ड सीन दिलेत. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.