Join us  

सुमित व्यास, अमोल पराशर आणि मानवी गागरू या भन्नाट त्रिकुटाचे 'ट्रिपलिंग ३' लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 8:43 PM

Tripling 3 : ‘ट्रिपलिंग’ या लोकप्रिय फ्रँचायझीच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे.

‘ट्रिपलिंग’ या लोकप्रिय फ्रँचायझीच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. TVF फेम अरुनाभ कुमार यांची निर्मिती असलेल्या या सीझनचे दिग्दर्शन नीरज उधवानी यांनी केले आहे; कथा अरुनाभ कुमार व सुमीत व्यास यांची आहे; पटकथा सुमीत व्यासची तर संवाद सुमीत व्यास व अब्बास दलाल यांनी लिहिले आहेत. सुमीत व्यास, मानवी गागरू, अमोल पराशर, कुमुद मिश्रा, शेरनाझ पटेल व कुणाल कॉय कपूर यांच्यातील खणखणीत केमिस्ट्री आणि सर्वांची दमदार कामगिरी यांनी युक्त असलेले हे हलकेफुलके कौटुंबिक नाट्य २१ ऑक्टोबरपासून केवळ झी५वर बघता येणार आहे.

ट्रिपलिंगच्या या सीझनच्या केंद्रस्थानी चारु व चिन्मय (आईवडील) वेगळे होत असल्याची बातमी आहे, यामुळे चंदन, चंचल व चितवन या भावंडांना एका नवीन साहसासाठी सज्ज व्हावे लागले आहे. हे नाट्य पुन्हा एकदा त्यांच्या डोंगरांमधील घरात घडणार आहे. आणि यावेळी छोट्याछोट्या घरगुती साहसांच्या मालिकेत या भावंडांना त्यांच्या तेवढ्याच चक्रम आईवडिलांची साथ आहे, आपले कुटुंब व घर गमावण्याची भीती त्यांच्या मनात शिरली आहे. सुमीत व्यास म्हणाला, “ट्रिपलिंग ही माझ्यासाठी ‘गो-टू थेरपी’ आहे, यात मला कल्पनांना आकार देता येतो, पटकथा व संवाद लिहिता येतात, अभिनय करता येतो, एका व्यापक चित्रात योगदान देता येते आणि त्याहून अधिकही काही करता येते. आणि प्रत्येक सीझनसोबत त्यातील व्यक्तिरेखा माझ्या अधिक जवळ येत आहेत आणि कथनशैलीही अधिक ओळखीची होत आहे. हा सीझन म्हणजे वेडेपणाची एक सफर असेल, कारण, हे ‘वेड’ आमच्या कुटुंबातच आहे हे आम्हा भावंडांना कळणार आहे. अर्थात एका गोष्टीचे मी तुम्हाला वचन देऊ शकतो, ती म्हणजे ही गोष्ट हृदयस्पर्शी होणार आहे, त्यामुळे ही बघण्याचा अनुभव आणखी छान करण्यासाठी तुमच्या वेड्या कुटुंबाबरोबर ती बघा.”मानवी गागरू म्हणाली, “आम्ही जेव्हा जेव्हा ट्रिपलिंगचे शूटिंग करतो, तेव्हा घरी परत आल्याची भावना मनात असते! आम्हाला आता एकमेकांची वैशिष्ट्ये आणि विचित्रपणा माहीत झाला आहे आणि आमच्यात एक प्रकारची उब तयार झाली आहे, त्यामुळे हे जवळजवळ खरे कुटुंब असल्यासारखेच आहे. शिवाय प्रत्येक सीझनमध्ये आम्ही मोठ्या शेड्युलसाठी आउटडोअर शूटिंग करतो आणि ते आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते. या सीझनमध्ये आम्ही आणखी नाट्य, आणखी भावना आणि आणखी खूप हास्य व गंमत घेऊन परत आलो आहोत.”

अमोल पराशर म्हणाला, “मी या शोचा आणि यातील टीमचा कायमच कृतज्ञ आहे, कारण, यांनी मला चितवन ही माझी सर्वांत लोकप्रिय व्यक्तिरेखा दिली आहे. या चक्रम मुलाच्या व्यक्तिरेखेइतका मोठा परिणाम माझ्या अन्य कोणत्याही व्यक्तिरेखेने साधलेला नाही. प्रत्येक सीझनसोबत शोचा चाहतावर्ग वाढत आहे आणि या नवीन सीझनसाठीही चाहते परत येतील असा आत्मविश्वास मला आहे. शिवाय यामुळे प्रेक्षकांची एक संपूर्ण नवीन पिढी तयार होणार आहे, कारण, ट्रिपलिंगहून सर्वांगीण असे वेबवर दुसरे काहीच नाही.”