Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ताली'मध्ये बालपणीची गौरी साकारलीय या मराठी अभिनेत्रीनं, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची आहे पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:08 IST

Taali Web Series : 'ताली' वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)ने नेहमीच आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुष्मिताची आगामी वेबसीरिज ताली (Taali) चर्चेत आली आहे. नेहमीपेक्षा वेगळा विषय असणाऱ्या या सीरिजच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. नुकताच तालीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ताली वेबसीरिजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या अस्तित्वासाठी तिला समाजात खूप काही सहन करावे लागते. तिला तिच्या हक्कासाठी लढावं लागतं. समाजाशी सामना करत ती एक किन्नर ते सोशल वर्कर बनते. तिचा हा प्रवास सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सुष्मिता सेन या सीरिजमध्ये पॉवरफुल अंदाजात पाहायला मिळणार आहे. 

रवी जाधव दिग्दर्शित ताली वेबसीरिजची सुरूवात बालपणापासून होेते. तिचे शालेय जीवन सुरळीत असते. मात्र तिचा खरा संघर्ष कॉलेज जीवनात सुरू होतो. त्यांच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री कृतिका देव निभावत आहे. ट्रेलरमधील कृतिकाचं काम पाहून सर्वजण तिच्या कामाचं कौतुक करत आहेत. तिचे चाहते या सीरिजमधील तिचे काम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

कृतिका देव मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, आई कुठे काय करते मालिकेतील यश म्हणजेच अभिषेक देशमुखची ती पत्नी आहे. कृतिकाने मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. तिने राजवाडे अँड सन्स, प्राईम टाईम, बकेट लिस्ट या मराठी सिनेमात तर पानिपत, हवाईजादा या हिंदी सिनेमात काम केले आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनरवी जाधव