Join us

लोकप्रिय सीरिज 'पंचायत'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! पाचव्या सीझनबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:01 IST

'पंचायत'च्या पाचव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Panchayat: अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या मालिकेच्या पाचव्या सीझनचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. 'पंचायत'च्या चारही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे, त्यामुळे पाचव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'पंचायत'च्या चौथ्या सीझनमध्ये फुलेरा गावातील निवडणुकीवरून मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात मोठी लढाई पाहायला मिळाली. या सीझनच्या शेवटी प्रधानजींचा पराभव होतो. आता पाचव्या सीझनमध्ये काय घडणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मुंबई एंटरटेनमेंट करस्पॉन्डेंटच्या रिपोर्टनुसार, 'पंचायत ५' चे लेखन सध्या सुरू आहे. सर्व कलाकार आपापल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्यामुळे या सीरिजचे शूटिंग नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२५ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

चौथ्या सीझनच्या यशानंतर लगेचच निर्मात्यांनी पाचव्या सीझनची घोषणा केली होती. सूत्रांनुसार, जर शूटिंग डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले, तर पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामासाठी वेळ लागेल. त्यामुळे, 'पंचायत ५' पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणे जवळजवळ अशक्य आहे.  माहितीनुसार, हा सीझन जून किंवा जुलै २०२६ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

पाचव्या सीझनमध्ये काय खास?

'पंचायत ५' मध्ये प्रेक्षकांना काही नवीन आणि रोमांचक गोष्टी पाहायला मिळतील. विशेषतः, सचिवजी (जितेंद्र कुमार) आणि रिंकीची (सावंजा) प्रेमकथा कशी पुढे जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, प्रल्हादचा (फैजल मलिक) आमदारकीची निवडणूक जिंकतो की नाही, हे पाहणेही मनोरंजक असेल. या सर्व गोष्टींमुळे 'पंचायत ५' हा सीझन आणखी खास असणार आहे.

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटी