Join us  

'लंपन'च्या निमित्ताने गीतांजली कुलकर्णीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 5:37 PM

Geetanjali Kulkarni : अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोनी लिव्‍हवरील बहुप्रतिक्षित मराठी ओरिजिनल सिरीज 'लंपन'सह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्‍ज झाली आहे.

मराठी आणि हिंदी सिनेमामध्‍ये लक्षवेधक अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली गीतांजली कुलकर्णी (Geetanjali Kulkarni) सोनी लिव्‍हवरील बहुप्रतिक्षित मराठी ओरिजिनल सिरीज 'लंपन'सह पुन्‍हा एकदा रसिकांना भुरळ घालण्यासाठी सज्‍ज झाली आहे. आपल्‍या करिअरमध्‍ये अनेक संस्‍मरणीय भूमिका साकारलेल्‍या गीतांजलीच्या 'लंपन'च्‍या हृदयस्‍पर्शी कथेने लक्ष वेधून घेतले. 

प्रकाश नारायण संत यांची प्रख्‍यात साहित्‍य निर्मिती 'वनवास'मधील अमर भूमिका 'लंपन'चे गीतांजलीच्‍या मनात खास स्‍थान आहे. ही भूमिका त्‍यांना या लोकप्रिय कथेबाबत त्‍यांच्‍या बालपणीच्‍या आठवणींना उजाळा देते. याबद्दल गीतांजली म्‍हणाली की, 'लंपन'ची कथा बालपणीच्‍या आणि गतकाळातील दिवसांच्‍या आठवणींना उजाळा देईल. या सिरीजमध्‍ये आजीची भूमिका साकारत असताना देखील कथानकाने माझ्यामध्‍ये प्रबळ भावना जागृत केल्‍या, ज्‍यामुळे मला सतत माझ्या बालपणाची आठवण झाली. ही परिपूर्ण सिरीज आहे, जी प्रत्‍येक प्रेक्षकाला त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या काळाकडे घेऊन जाईल, त्‍यांना पुन्‍हा एकदा त्‍या काळाला उजाळा देण्‍याची संधी देईल. 

निुपण धर्माधिकारी यांचे सर्वोत्तम दिग्‍दर्शन आणि क्रिएटिव्‍ह टीमच्‍या उत्तम कामगिरीसह सिरीज 'लंपन' संवदेनशील भावना आणि मार्मिक प्रतिबिंबाच्‍या प्रवासावर घेऊन जाते. श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे आणि अमित पटवर्धन यांची निर्मिती असलेली ही सिरीज प्रेक्षकांना साध्‍या युगात बालपणीच्या चक्रव्‍यूहातून जाणारा तरूण मुलगा लंपनच्‍या निरागस साहसी कृत्‍यांचा अनुभव देते, जेथे तो ओळख आणिा आपलेपणाचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न करतो. 'लंपन' सोनी लिव्‍हवर १६ मेपासून पाहायला मिळेल.