Join us  

मोना सिंग दिसणार वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'मध्ये, शूटिंगला झाली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 2:02 PM

पान पर्दा जर्दा ही एक रोमांचकारी गँगस्टर ड्रामा वेब सिरीज आहे  जी मध्य भारतातील बेकायदेशीर अफूच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

मिर्झापूर, अपहरण आणि पाताल लोकसह क्राइम ड्रामा प्रकाराशी संबंधित कथांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप पसंती दिली गेली आहे. या यादीत पान पर्दा जर्दा या वेब सीरिजचेही नाव जोडले गेले आहे. जिओ स्टुडिओ आणि रिलायन्स एंटरटेनमेंटची संयुक्त निर्मिती असल्याने, या शोमध्ये मोना सिंग, तन्वी आझमी, प्रियांशू पैन्युली, तान्या माणिकतला आणि राजेश तैलंग यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. जिओ स्टुडिओजने २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या हाय-ऑक्टेन गँगस्टर ड्रामा पान पर्दा जर्दा या वेबसिरीजची शूटींग सुरु केली आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि ड्रीमर अँड डूअर्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पनात्मक आणि निर्मित या वेब सीरिजमध्ये  गुरमीत सिंग आणि शिल्पी दासगुप्ता या दिग्गज दिग्दर्शकांसह, पॉवरहाऊस शोरनरची टीम मृघदीप सिंग लांबा, सुपर्ण वर्मा आणि हुसैन दलाल तसेच अब्बास दलाल ही प्रतिभावान लेखक जोडी एकत्रित येणार आहे. 

पान पर्दा जर्दा ही एक रोमांचकारी गँगस्टर ड्रामा वेब सिरीज आहे  जी मध्य भारतातील बेकायदेशीर अफूच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अशी एक आकर्षक कथा जिथे कुटुंब आणि प्रियजनांमध्ये युद्धाच्या रेषा आखल्या जातात आणि निष्ठा बदलली जाते, मालिका एक शक्तिशाली मनोरंजन देण्याचे वचन देते.

सह-दिग्दर्शक गुरमीत सिंग म्हणतात, "आम्ही जिओ स्टुडिओजच्या सहकार्याने पान पर्दा जर्दा सह एक नवीन प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत. या मालिकेचा रंग आणि पोत खुपचं अनोखी आहे. ह्याची कथा, कृती, कौटुंबिक नाटक मध्य भारतातील बेकायदेशीर अफूच्या तस्करीच्या पार्श्‍वभूमीवर आधारित आहे."तर लेखक सुपर्ण एस वर्मा यांनी म्हटले की, ''भोपाळच्या समृद्ध इतिहास आणि टेपेस्ट्रीमध्ये अडकलेल्या पान पर्दा जर्दाचे रोमँटिक आणि हिंसक जग तयार करणे अद्भुत होते. आमच्या कल्पनेने पात्रांना आणि परिस्थितींना पंख दिले जे नेहमीचे सिनेमॅटिक नियम मोडतात.  या मालिकेने मला जुन्या मित्रांसोबत आणि नवीन मित्रांसोबत काम करण्याची संधी देखील दिली जी एक अतिरिक्त फायदा होती, ज्यामुळे ह्याची प्रक्रिया खूप समाधानकारक होती.”

टॅग्स :मोना सिंग