Join us  

'पंचायत'च्या सचिवने शेअर केली लव्हस्टोरी, म्हणाला, "तिच्या प्रेमात पडण्यामागे होतं विचित्र कारण "

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:16 PM

अभिनेता जितेंद्र कुमार छोट्या शहरातून आला आहे. तिथे मुलांना फार विचित्र प्रेम होतं असं तो म्हणाला.

'पंचायत' चा सचिव, 'कोटा फॅक्टरी'चा जितू भैय्या म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) सध्या चर्चेत आहे. चाहते त्याच्या आगामी 'पंचायत 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. जितेंद्रने अनेक वेबसीरिजमधून चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तसंच त्याचा साधाभोळा चेहरा, अप्रतिम अभिनय प्रेक्षकांना आकर्षित करतं. जितेंद्र कुमारने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या प्रेमाची कहाणी सांगितली आहे.

जितेंद्र कुमार छोट्या शहरातून आला आहे. तिथे मुलांना फार विचित्र प्रेम होतं असं तो म्हणाला. म्हणजे नक्की काय तर त्याने स्वत:चीच प्रेम कहाणी शेअर केली. तो म्हणाला, "मला एक मुलगी फार विचित्र कारणामुळे आवडली होती. त्याचं झालं असं की एक दिवस ती वर्गात उशिरा आली होती तर शिक्षक तिच्यावर खूप ओरडले. संपूर्ण वर्गासमोर तिची प्रतिमा मलीन झाली. मी तेव्हा वर्गात टॉपर असायचो. मला वाटलं की मी तिच्या जागेवर असतो तर मला शिक्षक इतकं नसते रागवले."

तो पुढे म्हणाला, "एक दोन दिवसांनंतर ती मुलगी माझी क्रशच बनली आणि मी तिच्या प्रेमात पडलो. मला बराच काळ तिच्यावर क्रश होतं आणि मी तिच्याकडे आयुष्यभराचं प्रेम म्हणूनच पाहायचो. छोट्या शहरात तुम्हाला कोणावर प्रेम करण्यासाठी किंवा क्रश होण्यासाठी फार विचित्र कारणं सापडतील. जिथे को-एड शाळा कमी असतात आणि मुलगा-मुलगीला वेगवेगळं बसवलं जातं तिथे तुम्हाला अशाच कारणांमुळे प्रेम होतं."

जितेंद्र कुमार अभिनयात येण्याआधी आयआयटीत शिकत होता. IIT खरगपूरमध्ये तो होता. तिथलाही एक किस्सा शेअर करत तो म्हणाला, "आम्ही एकदा ट्रेनने जयपूरहून कोलकत्याला निघालो होतो. आमच्या १२ मित्रांच्या ग्रुपमध्ये एक मुलगीही होती जिला दिवाळीमध्ये लॅपटॉप मिळाला होता. आम्ही सगळेच तिच्यासाठी खूप खूश होतो. पण पुढच्याच दिवशी तिचा लॅपटॉप चोरीला गेला. ती खूप रडत होती आणि तेव्हा माझा मित्र तिच्या प्रेमात पडला. आजही त्याला ती आवडते आणि तो आजपर्यंत मूव्ह ऑन करु शकला नाही."

टॅग्स :सेलिब्रिटीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टवेबसीरिजबॉलिवूड