Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द फॅमिली मॅन ३'मध्ये रुक्माच्या भूमिकेत दिसणार जयदीप अहलावत, अशी झाली सीरिजमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:38 IST

The Family Man 3 Web Series : 'द फॅमिली मॅन ३'मध्ये अभिनेता जयदीप अहलावतची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लेखक आणि निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरु आणि कृष्णा डी.के. यांची लोकप्रिय सीरिज 'द फॅमिली मॅन' नेहमीच प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. आता याच्या तिसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढवल्या आहेत. या सीरिजमधील कथानक आणि पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. अशातच आता अभिनेता जयदीप अहलावतची या सीरिजमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या निमित्ताने त्याने सीरिजमधील आपल्या प्रवासाबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि आपल्या 'रुक्मा' या पात्राबद्दल माहिती दिली.

जयदीप अहलावतने सांगितले, "या प्रकल्पाशी जोडले जाण्याची सुरुवात एका फोन कॉलने झाली. एक दिवस अचानक डीकेचा फोन आला आणि ते म्हणाले की, त्यांना तिसरा सीझन मागील दोन्ही सीझनपेक्षा मोठा, दमदार आणि वेगळा बनवायचा आहे. याच संभाषणादरम्यान त्यांनी माझ्यासोबत कथेचा मूलभूत ढाचादेखील शेअर केला, जो ऐकून मी लगेचच या जगाकडे खेचला गेलो. मला वाटले की ही कथा नवीन असण्यासोबतच मला एक असे पात्र साकारण्याची संधी देईल, जे मी आतापर्यंत केले नाही."

या कारणामुळे अभिनेत्याने सीरिजमध्ये काम करण्यास दिला होकारकथेची सुरुवातीची झलक ऐकताच जयदीपने या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला की, "राज आणि डीकेसारखी प्रतिभावान क्रिएटर जोडी आणि मनोज बाजपेयींसारखा कलाकार समोर असताना कोणत्याही अभिनेत्यासाठी 'हो' म्हणणे खूप सोपे होते. 'द फॅमिली मॅन'सारख्या यशस्वी शोचा भाग बनणे ही स्वतःच एक मोठी गोष्ट आहे आणि ही संधी पकडण्यास मी थोडाही वेळ लावला नाही."

सीरिजमधील जयदीपचे पात्रसीरिजमधील रुक्मा या पात्राबद्दल जयदीप म्हणाला की, "जेव्हा मी हे पात्र वाचायला सुरुवात केली, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की हे पात्र कोणत्या दिशेने जाईल. स्क्रिप्ट वाचताना माझ्या मनात एक वेगळी प्रतिमा तयार होत होती, पण राज आणि डीके यांच्या मनात रुक्मासाठी एक अत्यंत स्पष्ट आणि खास दृष्टिकोन होता. जसा त्यांनी शूटिंग सुरू केली, तसतसा रुक्मा हळूहळू एका अशा रूपात साकारत गेला ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. या पात्राची खासियत अशी आहे की तो कशाचीही पर्वा करत नाही. त्याचे एकटे राहणे त्याला कठोर दाखवू शकते, पण प्रत्यक्षात त्याच्या आत एक वेगळी खोली दडलेली आहे."

'द फॅमिली मॅन सीझन ३' कधी येणार भेटीला?जयदीपने सांगितले की, मनोज वाजपेयींचे पात्र श्रीकांत तिवारी हे एक असे पात्र आहे ज्याला प्रेक्षक सहज स्वीकार करतील. तो कुटुंबाशी जोडलेला आहे आणि एका गुप्तहेराची जबाबदारी सांभाळत कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्नही करतो, पण रुक्मा याच्या अगदी उलट आहे. तो कुटुंबाला वेगळे ठेवतो. हाच त्याचा सर्वात मनोरंजक पैलू देखील आहे, कारण तो एक असा माणूस आहे जो दिसण्यात कठोर आहे, पण कुठेतरी आत दडलेल्या भावनांशी लढत आहे. 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन २१ नोव्हेंबरपासून प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaideep Ahlawat as Rukma in The Family Man 3

Web Summary : Jaideep Ahlawat joins 'The Family Man 3' as Rukma. He was drawn by the unique story and his character's depth. He contrasts Manoj Bajpayee's character with his solitary nature. Season 3 streams from November 21st.
टॅग्स :मनोज वाजपेयी