Join us  

अखेर प्रतीक्षा संपली..! अभिषेक बच्चनची 'ब्रीद २' वेबसीरिज या दिवशी येतेय भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 4:30 PM

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चनची लोकप्रिय वेबसीरिज ब्रीदच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा सीझन भेटीला येत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चनची लोकप्रिय वेबसीरिज ब्रीदच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा सीझन भेटीला येत आहे. दरम्यान आज प्राइम व्हिडीओने आज बहुप्रतिक्षित ब्रीद: इंटू द शॅडोच्या नवीन सीझनची घोषणा केली. दुसरा सीझन ९ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

रोमांचक वळणे आणि धक्क्यांनी युक्त असलेल्या या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये अभिषेक ए. बच्चन व अमित साध हेच प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. मात्र, या नाट्यातील थरार व रहस्य आणखी गहिरे होणार आहे. नित्या मेनन, सैयामी खेर व इवाना कौर या शोमध्ये पुन्हा दिसणार आहेत आणि त्यांच्या व्यक्तिरेखा अधिक उत्क्रांत होत जाणार आहे. त्यामुळे नवीन सीझनला अधिक रोमांचक अॅक्शनची फोडणी मिळणार आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची शोची ताकद आणखी वाढणार आहे. विक्रम मल्होत्रा व अबण्डंशिया एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित या आठ भागांच्या शोची सहनिर्मिती व दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केले होते. मागील सीझनची धुराही त्यांनीच सांभाळली होती.

“ब्रीद: इंटू द शॅडोज या आमच्या प्रमुख थ्रिलर शोचा नवीन सीझन आणणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे,” असे प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या. “प्रेक्षकांनी नवीन सीझनची मागणी करणे ही शोच्या यशाला मिळालेली पावती असते. कथनकारांच्या जीव तोडून काम करणाऱ्या टीमने निर्माण केलेल्या व अफलातून कलावंतांनी जिवंत केलेल्या या रहस्यमय थरारनाट्याच्या नवीन सीझनमध्ये आशा आणि तणाव यांची प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारी गुंफण आहे. अबण्डंशिया एण्टरटेन्मेंटसोबत आम्ही दीर्घकाळापासून जोडलेले आहोत, आम्ही एकत्रितपणे अनेक शो व फिल्म्सची निर्मिती केली आहे, पण ‘ब्रीद’ फ्रॅंचायझी आमच्यासाठी नेहमीच विशेष राहील, कारण, हा आमच्या सहयोगातून निर्माण झालेला पहिला प्रकल्प आहे. ब्रीथ: इंटू द शॅडोज सीझन २ हे धाडसी, रहस्यमय नाट्य आहे. थरारनाट्यासाठी आवश्यक ते सर्व घटक यात आहेत आणि ते उत्तमरित्या वापरण्यात आले आहेत.” दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी ब्रीथ: इंटू द शॅडोजचे सहलेखनही अर्शद सईद, विक्रम तुली, प्रिया सागी व अभिजित देशपांडे यांच्या साथीने केले आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चन