Join us  

माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:25 PM

क्रिमिनल जस्टीसचा नवीन सीझन अर्थात क्रिमिनल जस्टीस 4 ची घोषणा झालीय (criminal justice 4, pankaj tripathi)

वकील माधव मिश्राचं नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येते पंकज त्रिपाठी यांची अदाकारी. पंकज यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने माधव मिश्राची भूमिका चांगलीच लोकप्रिय केली. 'क्रिमिनल जस्टीस' वेबसिरीजमध्ये पंकज यांनी साकारलेला माधव मिश्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. होय तुम्ही बरोबर वाचताय.  'क्रिमिनल जस्टीस' च्या नवीन चौथ्या सीझनची घोषणा झालीय. याचा एक छोटासा व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय.

'क्रिमिनल जस्टीस 4' वेबसिरीजची घोषणा झालीय. Hostar च्या X हँडलवरून रिलीज करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये न्यायालयाचे दृश्य दिसत आहे. वकील माधव मिश्रा अर्थात पंकज त्रिपाठी म्हणतात, 'प्रसिद्ध डॉक्टर...' यानंतर ते प्रेक्षकांकडे कॅमेरात पाहून म्हणतात, 'कोर्ट चालू आहे. थांबा, आम्ही येतोय, निवांत तिकडे बघ आणि जा.' असा गंंमतीदार यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कोर्ट सुरू आहे आणि नव्या सीझनची तयारीही सुरू आहे. माधव मिश्रा येणार आहेत.

हॉटस्टारच्या 'क्रिमिनल जस्टिस' या लोकप्रिय मालिकेचे मागील तीन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता त्याचा चौथा सीझन येत आहे. या मालिकेच्या चौथ्या पर्वाची घोषणा आज शुक्रवारी करण्यात आली. हॉटस्टारने घोषणेचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'क्रिमिनल जस्टीस 4' प्रेक्षकांचं मन जिंकणार यात काही शंका नाही. 

टॅग्स :पंकज त्रिपाठीमराठीमराठी अभिनेता