Join us  

काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 8:31 AM

Richa chaddha: रिचाने प्रेग्नंसीच्या काळात हिरामंडीचं शुटिंग केलं आहे. इतकंच नाही तर यातील एका सीनसाठी तिने चक्क दारुही प्यायली.

संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansale) यांची हिरामंडी ही वेबसीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या सीरिजमध्ये मनिषा कोईराला (manisha koirala), संजिदा शेख (sanjeeda sheikh), सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha),रिचा चड्ढा (Richa chaddha) यांसारख्या अनेक लोकप्रिय अभिनेत्री झळकल्या आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढाने प्रेग्नंसीच्या काळात या सीरिजचं शूट केलं आहे. इतकंच नाही तर तिने एका डान्स सिक्वेन्ससाठी चक्क ९९ वेळा रिटेक दिला. नेटफ्लिक्सने रिचाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'हिरामंडी'तील कलाकार सगळ्यात जास्त रिटेक कोणी दिले याविषयी चर्चा करत होते. यात सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी यांनी १२-१३ रिटेक दिल्याचं म्हटलं. तर, रिचाने 'मी एका सीनसाठी तब्बल ९९रिटेक दिले', असा खुलासा केला.

"डान्स सिक्वेन्स शूट करताना सर्वात जास्त रिटेक देणाऱ्यांमध्ये माझा पहिला क्रमांक लागतो. मी शतक ठोकता ठोकता राहिले. २०० ते ३०० एक्स्ट्रा लोक तुमच्याकडे पाहत असता आणि तुम्ही सतत चुकत असता तेव्हा तो क्षण सोपा नसतो. पण, ज्यावेळी तुम्ही त्यावर मात करता तेव्हा ती भावना फार सुखावणारी असते. अरे व्वा, मी हे करु शकते हे मला माहितीच नव्हतं अशी ती भावना, तो क्षण असतो," असं रिचा म्हणाली.

रिचाने या व्हिडीओमध्ये ज्याप्रमाणे तिच्या भूमिकेविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे तिने झूमला दिलेल्या मुलाखतीमध्येही अनेक खुलासे केले. यात एका सीनसाठी तिने चक्क दारु प्यायली होती. 'मी सीनमध्ये दारुच्या नशेत असल्याचं दाखवायचं होतं. त्यामुळे ३०-४० टेकनंतर एक क्वार्टर घेऊन काय होतंय ते पाहुयात असा विचार केला. मी थोडीशी प्यायले. पण, त्यामुळे गोष्टी अजूनच बिघडल्या. मला कुठेही आळस आल्याचं दाखवायचं नव्हतं. मला ग्रेस घालवायची नव्हती. पणस मध्यप्राशन केल्यानंतर आपण फक्त अभिनय केलेलाच बरा हे माझ्या लक्षात आलं, असं रिचा म्हणाली.

दरम्यान, या सीरिजमध्ये रिचासह अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, शेखर सुमन, फरदीन खान, ताहा शाह, सोनाक्षी सिन्हा आणि मनिषा कोईराला हे कलाकार झळकले आहेत.

टॅग्स :रिचा चड्डासेलिब्रिटीवेबसीरिजसंजय लीला भन्साळीमनिषा कोईराला