Join us
Daily Top 2Weekly Top 5

वॅक्स म्युझियममध्ये अभिनेता सोनू सूदचा पुतळा दाखल

By admin | Updated: October 10, 2016 13:15 IST

लोणावळ्याच्या सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये अभिनेता सोनू सूदचा पुतळा दाखल झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १० - जागतिक दर्जाचे भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असा नावलौकिक असलेल्या सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम मध्ये अभिनेता सोनू सूद याचा हुबेहुब मेणाचा पुतळा तयार करण्यात आला असल्याचे कलावंत सुनिल कंडलूर यांनी सांगितले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे देखिल अर्धे काम पुर्ण झाले असून लवकरच मुंडे यांचा पुतळा देखिल नागरिकांच्या भेटीला येईल असे संग्रहालयाचे संचालक सुभाष कंडलूर यांनी सांगितले.
 सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियमच्या दालनाचा नुकतान माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या म्युझियम मध्ये सध्या शंभरहून अधिक मेणाचे पुतळे असून त्यामध्ये राष्ट्र पुरुष, अभिनेते, राजकिय नेते, खेळाडू यांच्या पुतळ्याचा समावेश आहे. लवकरच येथे सैराट गँलरी सुरु होणार असून सुप्रसिध्द आर्ची, परश्या व नागराज मंजुळे यांच्या पुतळ्याचे काम अंतीम टप्प्यात आले असल्याचे कंडलूर यांनी सांगितले.