अभिनेता विवेक ओबेरॉय गेल्या अनेक दिवसांपासून ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. काल याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक नागपुरात येणार होता. दुपारी तीन वाजता नागपुरात त्याची पत्रपरिषद होणार होती. तसा तो आलाही. पण नागपूर विमानतळावरून त्याला आल्या पावलीच माघारी परतावे लागले. होय, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. विवेक नागपूर विमानतळावर उतरला आणि नेमक्या त्याच क्षणी ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनाला स्थगिती मिळाल्याची वार्ता त्याला कळली. मग काय, विवेकने विमानतळाबाहेरही पडण्याची तसदी घेतली नाही. तो विमानतळावर उतरला आणि थोड्याच वेळात आल्या पावली मुंबईला रवाना झाला.‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
विवेक ओबेरॉय नागपुरात आला अन् आल्या पावलीच माघारी फिरला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 10:49 IST
अभिनेता विवेक ओबेरॉय काल ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक नागपुरात येणार होता. तसा तो आलाही. पण नागपूर विमानतळावरून त्याला आल्या पावलीच माघारी परतावे लागले.
विवेक ओबेरॉय नागपुरात आला अन् आल्या पावलीच माघारी फिरला!!
ठळक मुद्देकाल प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. त्यामुळे हा चित्रपट आज ११ एप्रिलला प्रदर्शित होऊ शकला नाही. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल.