Join us

टीझर अ‍ॅण्ड ट्रेलरचा व्हायरल ट्रेंड

By admin | Updated: March 30, 2016 01:11 IST

बॉलीवूड असो वा मराठी इंडस्ट्री, या ठिकाणी आगामी चित्रपटासांठी प्रेक्षकांना आकर्षित करता यावे यासाठी वापरले जाणारे प्रमोशन फंडे म्हणजे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये

बॉलीवूड असो वा मराठी इंडस्ट्री, या ठिकाणी आगामी चित्रपटासांठी प्रेक्षकांना आकर्षित करता यावे यासाठी वापरले जाणारे प्रमोशन फंडे म्हणजे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये पूर्वी प्रमोशनचे हे फंडे तितकेसे प्रसिद्ध नव्हते. काही वर्षांपूर्वीदेखील चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ट्रेलर प्रचलित होता. पण गेल्या दोन ते तीन महिन्यांत आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टा यांसारख्या सोशल वेबसाइटच्या माध्यमातून टीझरची क्रेझ पाहायला मिळत आहे. थोडक्यात, प्रमोशन फंड्याची ही परिस्थिती पाहता असेच म्हणावे लागेल की, सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हायरल ट्रेंड निर्माण झाला आहे.मराठी चित्रपटांच्या या ट्रेंडच्या माध्यमातून प्रेक्षक, रसिक मायबापपर्यंत चित्रपटांची ओळख जरी पोहोचत असली, तरी नेमकी टीझर ही काय पद्धत आहे, याची कल्पनादेखील मराठी प्रेक्षकांना माहीत नसल्याचे दिसते. बॉलीवूड चित्रपटांचा ट्रेलर पूर्वीपासूनच होत असल्यामुळे हा प्रकार मराठी इंडस्ट्रीमध्ये दाखल झाला, त्यामुळे त्याचे एवढे नावीन्य नव्हते. पण गेल्या काही महिन्यांत मराठी इंडस्ट्रीमध्ये बॉलीवूडपेक्षाही जलद गतीने टीझरचे प्रमाण वाढले असल्यामुळे प्रेक्षकदेखील विचारात पडला आहे की, टीझर म्हणजे नेमके काय आहे? याविषयी ‘लोकमत सीएनएक्स’ने दिग्दर्शक सुजय डहाके आणि प्रकाश कुंटे यांच्याशी साधलेला संवाद.शाळा, फुंतरू यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके म्हणतो, टीझर व मोशन पोस्टर हे हॉलीवूड कन्स्पेट आहे. पण सध्या आपल्याकडे टीझरचा व्हायरल ट्रेंड पाहायला मिळत आहे. टीझर म्हणजे चित्रपट चार ते पाच महिन्यांपूर्वी प्रदर्शित होण्याआधी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी चित्रपटाची फक्त ओळख उलगडली जाते. या चित्रपटात अभिनेता, अभिनेत्री व इतर कलाकार कोण असणार आहेत याची माहिती सांगितली जाते. तर ट्रेलरमध्ये चित्रपट न कळता सेटअप काय, एखादा डायलॉग किंवा लोकेशन म्हणजेच थोडक्यात चित्रपटातील काही आकर्षित दृश्ये झळकविली जातात. यानंतर येणारी मोशन पोस्टर ही पद्धत हॉलीवूडमध्ये खूप रूढ आहे. पण आपल्याकडे तितकी रूढ नाही. यामध्ये अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून चलचित्र म्युझिक बॅकग्राउंडच्या माध्यमातून प्रदर्शित केले जाते. आगामी चित्रपटासाठी आॅडियन्स जमा करण्यासाठी प्रमोशनचे हे फं डे वापरले जातात. हे फंडे वापरले तर चित्रपटाच्या प्रसिद्धीचा अंदाजदेखील बांधता येतो. तरुणांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट ‘कॉफी आणि बरंच काही’ तसेच आगामी चित्रपट ‘अ‍ॅण्ड जरा हटके’चे दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणाले की, आगामी चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर हे प्रदर्शित केलेच पाहिजेत. चित्रपटाचे दोन मिनिटांचे फुटेज व्हायरल करणे आवश्यक आहे. कारण प्रेक्षकांना काही तरी इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. काही दिलखेचक फुटेज टीझर, ट्रेलरच्या माध्यमातून दाखविले तरच प्रेक्षक बॉक्स आॅफिसपर्यंत पोहोचू शकतो. थोडक्यात सांगायचं तर, हे एका इनव्हिटेशन कार्डप्रमाणे असते. जसे की, लग्नाच्या पत्रिकेच्या एनव्हलपवर वधू व वराचे नाव म्हणजे टीझर आणि ट्रेलर म्हणजे विवाहाच्या ठिकाणी काय काय पाहायला मिळणार याची माहिती. यावरून असे दिसते की, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पोस्टर, टीझर, ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चर्चा राहते. तसेच पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाचा विसर पडू नये यासाठी टीझर हे खाद्य दिले जाते. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आला असेल तर त्याला अधिक गर्दी खेचण्यासाठी चित्रपटातील एखाद्या दिलखेचक फुटेजचा ट्रेलर दाखविला जातो. जसे की, लय भारी या चित्रपटातील सर्वांच्या ओठी असणारा प्रसिद्ध डायलॉग ‘आपला हात भारी...लाथ भारी...च्या.. मायला सगळंच लय भारी’ यांसारखे डायलॉग चित्रपटांच्या ट्रेलरच्या माध्यमातून दाखविले तर प्रेक्षक नक्कीच आकर्षित होतात. सध्या वृंदावन, रेती, रंगापतंगा, लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड, बॅन्जो, सैराट या आगामी चित्रपटांनी सोशल मीडियावर टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांना मोहात पाडून ठेवले असल्याचे चित्र दिसत आहे.मीदेखील फुंतरू या चित्रपटाचे पोस्टर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका वर्षाआधी प्रदर्शित केले होते आणि ट्रेलर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक महिन्यापूर्वी प्रदर्शित केला होता. त्यामुळे या प्रमोशन फंड्याचा उपयोग बॉक्स आॅफिसवरदेखील झालेला दिसून आला. - सुजय डहाके