Join us

विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 17:00 IST

सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे,मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय

ठळक मुद्देहे रॅप सॉंग या सर्व कलाकारांनी मिळून तयार केले आहे

मराठी मालिकांमध्ये बऱ्यापैकी नायक आणि नायिका यांच्या लग्नाला प्राधान्य असते. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' मधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. भोर येथे लग्न आणि इतर समारंभांचं शूटिंग पार पडलं. हे लग्न अगदी राजेशाही पद्धतीनं झालं तसंच कलाकारांनी अहोरात्र शूटिंग केलं.

थोडा विरंगुळा म्हणून कलाकारांनी एक गंमत केलीय. सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे,मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय. हे रॅप साँग या सर्व कलाकारांनी मिळून तयार केले आहे आणि ते चालबध्द देखील केलंय. हा रॅप सॉंगचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आणि  सध्या ते खूप व्हायरल होतंय. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करणारे कलाकार त्यांच्या सोशल मीडियाद्वारे देखील चाहत्यांसोबत संपर्कात राहतात आणि त्यांचं मनोरंजन करतात. 

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार