Join us

बिपाशावर विक्रमचा विश्वास

By admin | Updated: September 1, 2014 22:52 IST

बिपाशा बासूवर पूर्ण विश्वास असल्याने तिला क्रिएचर थ्रीडी या चित्रपटात काम करण्याची संधी दिली असल्याचे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचे म्हणणो आहे.

बिपाशा बासूवर पूर्ण विश्वास असल्याने तिला क्रिएचर थ्रीडी या चित्रपटात काम करण्याची संधी दिली असल्याचे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचे म्हणणो आहे. ‘क्रिएचर थ्रीडी’ हा हॉरर चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. बिपाशाला विक्रम यांनी या चित्रपटासाठी साईन केले, तेव्हा तिचे करिअर फारसे चांगले सुरू नव्हते. यावर विक्रम यांनी उत्तर दिले की, ‘ही तर विश्वासाची बाब आहे. मी बॉक्स ऑफिसवर बिपाशाच्या मागील चित्रपटांच्या अपयशाचा विचार करत नाही. मी दिग्दर्शित केलेला ‘डेंजरस इश्क’ अपयशी ठरला होता, तरीही बिपाशा माङयासोबत काम करायला तयार झाली. त्यामुळे ही फक्त विश्वासाची गोष्ट आहे. बिपाशाने या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. हा एक असाधारण चित्रपट आहे. अशा चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळावी अशी अपेक्षा आहे.’