Join us

Video: पाहा सलमानचा क्यूट अंदाज !

By admin | Updated: May 24, 2017 17:29 IST

अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाइट या सिनेमाची फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. 25 मे रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24- अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाइट या सिनेमाची फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. 25 मे रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पण त्याधी फॅन्सची उत्सुकता आणखी वाढावी म्हणून दिग्दर्शकाने प्रेक्षकांसाठी ट्रेलरच्या मेकिंगचा टिझर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरच्या मेकिंगमध्ये पूर्णपणे धमाल, मजा-मस्ती बघायला मिळते आहे. कबीर खान दिग्दर्शित ट्यूबलाइट या  सिनेमासाठी अभिनेता सलमान खानने बरीच मेहनत घेतली आहे. त्याची प्रचिती हा टिझर बघितल्यावर येते आहे. टिझरमध्ये सलमानचा क्यूट लूक बघायला मिळतो आहे. तसंच सिनेमातील इतर कलाकारांसोबत त्याची बॉण्डिंगही दिसून येत आहे.  
दिग्दर्शक कबीर खान यांचा ट्यूबलाइट या सिनेमाची कथा  1962 च्या भारत-चीन युद्धाभोवती फिरणारी आहे. दोन भावांची कहाणी या सिनेमात आहे तसंच सिनेमाला भावनिक टच देण्यात आला आहे. त्याची झलक गुरूवारी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्यूबलाइट या सिनेमाचं विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने सलमान खान आणि कबीर खान तीसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी "एक था टायगर", "बजरंगी भाईजान" हे दोन हिट सिनेमे या जोडीने केले होते. म्हणुनच ट्यूबवाइट या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ईदच्या मुहुर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.