Join us

VIDEO: शाहरूखच्या इंटरव्यूमध्ये क्यूट अबरामची एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

By admin | Updated: January 31, 2017 17:36 IST

शाहरूखने अबरामला जवळ बोलावलं आणि त्याच्या अंगठ्याची पप्पी घेतली. त्यानंतर मुद्दाम इंजेक्शन देण्याची एक्टिंग शाहरूखने केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 -  चर्चेत कसं राहायचं हे किंग खान शाहरूखला चांगलंच माहिती आहे, पण त्याची ही कला त्याचा सर्वात लहान मुलगा अबरामनेही आत्मसात केली आहे असं वाटतं. अबरामसोबत शाहरूखला खास लगाव आहे. त्याच्यासोबत तो आपले फोटोही शेअर करत असतोच.  
 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रईस सिनेमाबाबत शाहरूख एक इंटरव्यू देत होता. त्याचवेळी अबराम तेथे आला आणि आपल्या अंगठ्याला दुखापत झाल्याचं तो वडिलांना सांगू लागला. 
 
शाहरूखला राहावलं नाही, जबाबदार वडिल असल्याचं दाखवून देत शाहरूखने  अबरामला जवळ बोलावलं आणि त्याच्या अंगठ्याची पप्पी घेतली.
त्यानंतर मुद्दाम इंजेक्शन देण्याची एक्टिंग शाहरूखने केली. त्यावर  इंजेक्शनमुळे दुखत असल्याची एक्टिंग अबरामनेही केली.
 
त्यानंतर अबरामची समजूत काढून शाहरूखने सर्वांना बाय करून त्याला जाण्यास सांगितलं.सर्वांना बाय करून क्यूट अबराम लगेच तेथून निघून गेला. 
 
अबरामच्या  एन्ट्रिमुळे शाहरूखच्या त्या इंटरव्यूचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.