Join us

VIDEO : रंगूनचं 'मेरे पियां गये इंग्लंड' धम्माल गाणं रिलीज

By admin | Updated: January 26, 2017 14:30 IST

सिने निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा आगामी बहुचर्चित-बहुप्रतिक्षित सिनेमा 'रंगून'मधील एक धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 - सिने निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा आगामी बहुचर्चित-बहुप्रतिक्षित सिनेमा 'रंगून'मधील एक धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आले आहे. 'मेरे मियां गये इंग्लंड, न जाने कहां करेंगे लँड, के हिटलर चौक न', असे या गाण्याचे बोल असून हे गाणं कंगना राणौतवर चित्रित करण्यात आले आहे. 
 
या गाण्यात कंगना मिस जुलियाच्या लूकमध्ये बरीच आकर्षक दिसत आहे. सुरुवातीला हे गाणं ऐकताना तुम्हाला 'मेरे पिया गए रंगून' या गाण्याची आठवण येऊ शकते. या गाण्याचे बोल 'गुलजार' यांनी लिहिले असून वेगळ्या पठडीचा आणि आकर्षक आवाज असणा-या गायिका रेखा भारद्वाज यांनी हे गाणं गायलं आहे. 
सैफ अली खान, कंगना राणावत आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर असून यात युद्धसोबत प्रेमकहाणीही पाहायला मिळणार आहे.  शाहिद कपूर एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असून कंगना स्टंटवुमनची भूमिका साकारत आहे.