Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ' ऐ दिल'मध्ये फवाद खानला गजेंद्र चौहानांचा देशी पर्याय?

By admin | Updated: October 12, 2016 13:19 IST

बहुचर्चित ' ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानऐवजी गजेंद्र चौहानांना स्थान मिळाले आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - 'उरी' येथील लष्करी तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेला 'सर्जिकल स्ट्राईक' या मुद्यांवरून दोन्ही देशांमधील वातावरण तापलेले असून भारतीय चित्रपटसृष्टीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. राजकीय पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातल्यामुळे करण जोहरचा बहुचर्चित ' ऐ दिल है मुश्किल' आणि शाहरूख खानचा ' रईस' अडचणीत सापडला. फवाद खान आणि माहिरा खान या पाकिस्तानी कलाकारांमुळे या दोन्ही चित्रपटांना चांगलाच फटका बसला असून त्यांच्याऐवजी इतर कलाकारांना चित्रपटात घेण्याची मागणी होत आहे. 
या अडचणी कमी की काय म्हमून सोशल मीडियावरही हा विषय चर्चेत असून सध्या ' ऐ दिल है मुश्किल'चा नवा ( स्पूफ) ट्रेलर गाजत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फवाद खान खानऐवजी  'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदावरून वादात सापडलेले गजेंद्र चौहान यांचा चेहरा दिसत आहे.  लेखक सुमित पुरोहितने ‘ऐ दिल है मुश्किल फिल्म बनाना’ अशा नावाने रीलिज केलेल्या या ट्रेलरमध्ये फवादच्या चेह-यावर गजेंद्र चौहान यांचा चेहरा लावण्याच आला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप गाजत आहे.