Join us

VIDEO : दारु पिऊन गाडी चालवू नका, शाहरुख-अक्षयचे चाहत्यांना आवाहन

By admin | Updated: December 29, 2016 13:08 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना तसेच देशवासियांना नवीन वर्षांचे स्वागत करताना दारू पिऊन गाडी न चालवण्याचे आवाहन केले आहे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना तसेच देशवासियांना नवीन वर्षांचे स्वागत करताना दारू पिऊन गाडी न चालवण्याचे आवाहन केले आहे. आगामी सिनेमा 'रईस'मध्ये शाहरुख जरी दारु तस्कराच्या भूमिकेत असला तरी किंग खानने सोशल मीडियावर 'दारु पिऊन वाहने चालवू नका' असा संदेश दिला आहे, तर अक्षयनेही हाच संदेश देत ट्विटरवर 17 सेकंदांचा मोशल पोस्टर पोस्ट केला आहे. 
 
'पार्टी का माहौल है, खूब पार्टी करो. मजनू बनके लैला के साथ नाचो, लेकिन शराब पीके गाड़ी मत चलाओ',असे शाहरुखने आपल्या 20 सेकंदांच्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.  खिलाडी अक्षय कुमारनेही 'डोन्ड ड्रंक अँड ड्राईव्ह'चा संदेश देत 2017 मध्ये रिलीज होणा-या त्याच्या 'जॉली एलएलबी 2' सिनेमाचे प्रमोशन केले आहे.
 
'सब जानते हैं कि कानून के हाथ लंबे होते हैं. फिर भी पंगे लेते हैं. लेकिन, इस साल मत लेना. जश्न जम के करना, लेकिन भूल के भी शराब पीकर गाड़ी मत चलाना. नहीं तो सुना है न, कानून के हाथ लंबे होते हैं.', असे सांगत अक्कीने 'जॉली एलएलबी 2' चे मोशन पोस्टरदेखील शेअर केले आहे.  याद्वारे शाहरुख खान आणि अक्षय कुमारने सामाजिक संदेश देत आपल्या सिनेमाचेदेखील प्रमोशन केले आहे.