Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 19:00 IST

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा काल ‘रोका’ झाला. या ‘रोका’ सेरेमनीनंतर प्रियांकाच्या मुंबईतील घरी एक शानदार पार्टी दिली गेली.या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेत. पण चर्चा झाली ती एकट्या आलिया भट्टची.

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा काल ‘रोका’ झाला. या ‘रोका’ सेरेमनीनंतर प्रियांकाच्या मुंबईतील घरी एक शानदार पार्टी दिली गेली. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेत. प्रियांकाचे आवडते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, तिची जवळची मैत्रिण व सलमान खानची बहीण अर्पिता खान, आलिया भट्ट हे सगळे या पार्टीत दिसले. पण चर्चा झाली ती एकट्या आलिया भट्टची.

 होय, प्रियांका व निकच्या या पार्टीत आलिया अगदी स्टाईलिश अवतारात पोहोचली. पण का कुणास ठाऊक आलिया इतकी भावूक झाली की, तिचे डोळे पाणावले. प्रियांकाच्या घरात एन्ट्री घेत असताना आलिया डोळ्यांतील अश्रू टिपताना दिसली. प्रियांकाच्या घराच्या गेटमध्ये एन्ट्री करणारा आलियाच्या कारला मीडियाने घेरले. आलिया स्वत: मीडियाला बाजूला होण्याची विनंती करताना दिसली. पण ही विनंती करता करता आलिया अचानक इतकी इमोशनल झाली की, तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आता अश्रूंमागचे नेमके कारण मात्र आम्हाला ठाऊक नाही. प्रियांका व निकच्या आयुष्यातील इतका सुंदर क्षण पाहून आनंदाने आलिया भरून आले की दुसऱ्याच कुठल्या कारणाने तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, हे कळायला मार्ग नाही. एक मात्र खरे, आलियाचा हा व्हिडिओ ज्यानी कुणी पाहिला, तो प्रत्येकजण इमोशनल झाला. तुम्हीही बघा आणि तुम्हाला काय वाटते, ते आमच्यासोबत नक्की शेअर करा.तूर्तास आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असे मानले जातेय. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत.

 

 

टॅग्स :आलिया भट