Join us

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीपदा यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 10:05 IST

Veteran actress Sripradha dies due to Covid19 : श्रीपदा यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केले. धर्मेन्द्र, विनोद खन्ना आणि गोविंदांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली होती.

ठळक मुद्दे धर्मसंकट या सिनेमात त्या विनोद खन्ना यांच्यासोबत झळकल्या होत्या. 1993 साली एका टेलिव्हिजन शोमध्येही त्यांनी काम केले होते.

कोरोनाने मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का देत, एका प्रतिभावान अभिनेत्रीला हिरावून घेतले आहे. बॉलिवूड, भोजपुरी आणि साऊथ सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांत झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीपदा (Sripradha) यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले.  त्यांच्या निधनाचे वृत्त येताच साऊथसोबतच बॉलिवूड व भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (Veteran actress Sripradha dies due to Covid19)सिन्टाचे जनरल सेक्रेटरी अमित बहल यांनी श्रीपदा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना व्हायरसने अनेक प्रतिभावान व्यक्तिंना हिरावून नेले. याआधी माध्यमांनी याबद्दल सांगितले आहेच. मी सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा यांच्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. त्या मनोरंजनसृष्टीतल एक ज्येष्ठ सदस्या होत्या. त्यांनी दक्षिण आणि हिंदी चित्रपटांत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच प्रार्थना, असे ते म्हणाले.

श्रीपदा यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केले. धर्मेन्द्र, विनोद खन्ना आणि गोविंदांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली होती. श्रीपदा यांनी 1978 साली आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. पुराना पुरूष, धर्मसंकट, बेवफा सनम, आजमाइश, आग और चिंगारी, शैतानी इलाका, शोले और तुफान अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केले. धर्मसंकट या सिनेमात त्या विनोद खन्ना यांच्यासोबत झळकल्या होत्या. 1993 साली एका टेलिव्हिजन शोमध्येही त्यांनी काम केले होते.

टॅग्स :बॉलिवूडविनोद खन्ना