Join us
Daily Top 2Weekly Top 5

पन्नाशी पार करूनही अनिता राज आजही दिसतात फिट, पाहा त्यांचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:29 IST

अनिता यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्याचसोबत अनिता यांच्या फिटनेसची देखील चर्चा रंगते.

ठळक मुद्देअनिता यांनी वयाची पन्नाशी पार केली असली तरी त्या खूपच फिट आहेत. त्या न चुकता रोज व्यायाम करतात. व्यायामा करतानाचे फोटो अनिता नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

अनिता राज यांनी ऐंशी-नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना होत असे. नोकर बिवी का, असली नकली, स्वर्ग जैसा घर असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यांनी माया या दूरदर्शनवरील मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या मालिकेत त्यांनी माया ही मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. पण या मालिकेनंतर त्यांनी छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले होते. पण त्यानंतर अचानक अनेक वर्षांनंतर 24 या मालिकेत झळकल्या. 24 या मालिकेद्वारे अनिल कपूर छोट्या पडद्यावर पदार्पण करत असल्याने या मालिकेची खूप चर्चा झाली होती. या मालिकेत अनिता यांनी साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेनंतर त्या तुम्हारी पखी, एक था राजा एक थी राणी या मालिकेत झळकल्या.

अनिता राज त्या काळात एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनी नोकर बिवी का या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्यावेळी त्या दोघांच्या अफेअरची चर्चा झाली होती. पण काहीच महिन्यांत अनिता यांनी दिग्दर्शक सुनील हिंगोरानीसोबत लग्न केले आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अनिता यांनी मुलाच्या जन्मानंतर बॉलिवूडमध्ये काम करणे बंद केले. त्यांनी अनेक वर्षांनंतर अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. त्यांनी अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

अनिता यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्याचसोबत अनिता यांच्या फिटनेसची देखील चर्चा रंगते. त्यांनी वयाची पन्नाशी पार केली असली तरी त्या खूपच फिट आहेत. त्या न चुकता रोज व्यायाम करतात. व्यायामा करतानाचे फोटो अनिता नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.  

टॅग्स :धमेंद्र