Join us  

जिनिलिया देशमुखच्या 'जाने तू या जाने ना'तून डेब्यू करणार इमरान खान सध्या काय करतो?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 4:14 PM

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून जिनिलिया देशमुखसोबत अभिनेता इमरान खानने डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण...

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून जिनिलिया देशमुखसोबत अभिनेता इमरान खानने डेब्यू केला होता. जिनिलिया आणि इमरानची जोडी प्रेक्षकांना भावली देखील होती.   हा सिनेमा सुपरहिट ठरला होता .आमिर खानचा भाचा इमरान आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करतो आहे. 

इमरान खानने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता. इमरान खानचे काही चित्रपट हिट झाले. परंतु त्यानंतर अनेक चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाले. त्यामुळे दिग्दर्शकांनी अभिनेत्याकडे कानाडोळा करायला सुरुवात केली. त्याने अभिनय सोडून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवायचा निर्णय घेतला. इमरान काही दिवसांपूर्वी आमिर खानची मुलगी आयराच्या साखरपुड्यात दिसला होता. 

सध्या इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे.  इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.. इमरानने 2011 साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. काही दिवसांपूर्वीच अवंतिकाने  साहिब सिंग लांबा या निवोदित अभिनेत्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली. 

 

टॅग्स :इमरान खानजेनेलिया डिसूजा