चॉ कलेटी बॉय वरुण धवन सध्या अगदी हटके अशा बदलापूर या चित्रपटात काम करीत आहे. डार्क थ्रिलर चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेला दिग्दर्शक श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात वरुणचा लूकही अतिशय बदललेला दिसणार आहे. चित्रपटात वरुण साकारत असलेल्या पात्रच्या जीवनात तीन महिला येतात. या तीन महिलांची भूमिका दिव्या दत्ता, यामी गौतम आणि हुमा कुरैशी निभावणार आहेत. विशेष म्हणजे वरुण आणि दिव्या यांच्यावर काही बोल्ड सीन्सही शूट करण्यात आले आहेत. वरुण चित्रपटात एका प्रौढ व्यक्तीचीही भूमिका साकारत आहे. प्रौढ वरुणच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिव्या दत्ता
दिसणार आहे.