Join us  

OTT प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार वरुण धवन आणि सारा अली खानचा CoolieNo1?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:37 PM

अनेक सिनेमा OTT प्लॉटफॉर्मवर रिलीज होतायेत

कोरोना व्हायरसमुळे देशभरातील सगळे थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे सिनेमाचे जगाचे फार मोठे नुकसान झाले आहे.  यामुळे अनेक सिनेमा OTT प्लॉटफॉर्मवर रिलीज होतायेत. मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान आणि वरुण धवनचा कुली नंबर 1 OTTवर रिलीज होणार आहे. सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. अजून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. वरुणचे फॅन्स याची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहतायेत. आधी हा सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत. इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :कुली नंबर वनवरूण धवनसारा अली खान