Join us

वरुण आणि आलियाच्या 'बद्रिनाथ की दुल्हनिया'चा फर्स्ट लूक रिलीज

By admin | Updated: May 6, 2016 12:37 IST

'बद्रिनाथ की दुल्हनिया' चित्रपटातून वरुण धवन आणि आलिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 06 - अभिनेता वरुण धवन आणि आलिया यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 'बद्रिनाथ की दुल्हनिया' चित्रपटातून दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. 
 
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' प्रमाणे या चित्रपटातदेखील लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे हे फर्स्ट लूकवरुन स्पष्ट होत आहे. आलिया एकदम देसी अवतारमध्ये दिसत असून वरुण थोडा रावडी लूकमध्ये दिसत आहे.  
 
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक खेतान यांच्यावर आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. उत्तर भारतात या चित्रपटाचं शुटींग पार पडणार आहे. पुढील वर्षी 17 मार्च 2017 ला चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.