Join us  

अबब! ५ दिवसांत १५० कोटींचा गल्ला; थलपती विजयच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 3:17 PM

दाक्षिणात्य सिनेमांचा सध्या बोलबाला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Varisu South Film : दाक्षिणात्य सिनेमांचा सध्या बोलबाला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda), अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांच्यानंतर आता थलापति विजयच्या 'वारिसू' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने  पाच दिवसातच तबब्ल १५० कोटींचा गल्ला जमला आहे. एक आठवड्याच्या आतच १५० कोटींच्या क्लबमध्ये सिनेमाने एंट्री केली आहे. 

थलापति विजय (Thalapathy Vijay) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandhana) यांची मुख्य भूमिका असलेला वारिसू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. वारिसू पहिल्या दिवशी २९.७५ कोटींची कमाई केली तर पाचव्या दिवशी रविवारी २५ कोटींची गल्ला जमवत तुफान यश मिळवलं आहे. विजयचा हा सिनेमा तमिळनाडूमध्ये तुफान कामगिरी करतोय. दाक्षिणात्य सुपरस्टार विजयची तमिळनाडूमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. फक्त तमिळनाडू मध्ये सिनेमाने ६४.५० कोटी रुपयांचा बिझिनेस केला आहे. फक्त पाच दिवसात सिनेमाचे कलेक्शन (box office collection) 150 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'वारिसू' ही एक फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे. श्री व्यंकटेश्वरा क्रिएशन्सअंतर्गत दिल राजू यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील स्टारकास्टही तगडी आहे. थलापती विजय, रश्मिका मंदाना, प्रकाश राज, श्रीकांत मेका, श्याम, प्रभू,  सरथकुमार आणि जयसुधा यांच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :सिनेमातमीळ थलायवाज